आयपीएलच्या मागील पर्वातील विजेता मुंबई इंडियन्स संघाचे प्रायोजकत्व पेप्सी कंपनी करणार आहे. पेप्सी कंपनीकडे याआधीपासून आयपीएल स्पर्धेच्या शीर्षकाचे अधिकार आहेत. तसेच इतर सर्व संघांच्या प्रायोजकत्वामध्ये पेप्सी कंपनीचा वाटा आहे. फक्त मुंबई इंडियन्स संघाचे प्रायोजकत्व पेप्सी कंपनीकडे नव्हते.
यावेळी २०१४ च्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघही पेप्सी कंपनीच्या ताफ्यात सामील झाला आहे. मुंबई इंडियन्ससाठी सामन्याखेरीज वापरण्यात येणाऱया ‘जर्सी’वर पेप्सी कंपनीची जाहीरात असेल आणि यातून मुंबई इंडियन्स संघाला ३.५ कोटी रुपयांचा नफा होणार आहे.
दुसऱया बाजूला कोलकाता नाईट रायडर्सच्या प्रायोजकत्वांच्या यादीत भर पडली असून सँन्सुई कंपनी कोलकाता नाईड रायडर्ससाठी सामन्यांत वापरण्यात येणाऱया जर्सीवर जाहीरात करणार आहे. यासाठी सँन्सुई कंपनीने तब्बल ८ कोटी रूपये मोजले आहेत. सँन्सुई कंपनीने याआधी पुणे वॉरियर्स संघाचे प्रायोजकत्व केले होते. परंतु, यावेळी सँन्सुईने कोलकाताला पसंती दिली आहे.