Who is Mumbai Indians New Coach in WPL 2026: मुंबई इंडियन्स हा वुमन्स प्रीमियर लीगमधील चॅम्पियन संघ आहे. संघाने स्पर्धेतील ३ पैकी २ सीझनचं जेतेपद आपल्या नावे केलं. वुमन्स प्रीमियर लीगच्या पहिल्या सीझनचं जेतेपदही मुंबई इंडियन्सनने पटकावलं. त्यानंतर २०२४ मध्येही हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखाली मुंबई इंडियन्स WPL चॅम्पियन ठरली. तिन्ही सीझनमध्ये इंग्लंडची माजी खेळाडू चार्लोट एडवर्ड्स यांनी कोच म्हणून भूमिका निभावली होती, पण आता त्यांच्या जागी आलेल्या नव्या कोच कोण आहेत, जाणून घेऊया.

इंग्लंडची माजी खेळाडू चार्लोट एडवर्ड्स या पहिल्या तीन हंगामांसाठी मुंबई इंडियन्सच्या कोच होत्या. पण २०२५ मध्ये त्यांनी मुंबई इंडियन्सच्या कोच म्हणून राजीनामा दिला. इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाचे कोच म्हणून त्यांनी पदभार स्वीकारल्याने फ्रँचायझी क्रिकेट कोचिंगमधून माघार घेतली.

मुंबई इंडियन्सच्या पुढील हंगामासाठी कोचिंगची जबाबदारी लिसा केटली यांच्यावर आहे. लिसा केईट्स या ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडू आहेत. ज्या ऑस्ट्रेलिया महिला संघाच्या दोन वेळा वर्ल्डकप विजेत्या संघाचा भाग होता. ५४ वर्षीय केटली यांना खेळाडू आणि प्रशिक्षक अशा दोन्ही भूमिकांमध्ये दांडगा अनुभव आहे.

कोण आहेत लिसा केटली?

लिसा केटली यांनी ऑस्ट्रेलियाकडून सर्व फॉरमॅटमध्ये एकूण ९२ सामने खेळले असून त्यात ९ कसोटी, ८२ एकदिवसीय आणि १ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्याचा समावेश आहे. तसेच १९९७ आणि २००५ मध्ये ऑस्ट्रेलियाला विश्वचषक जिंकून देणाऱ्या संघाचाही त्या भाग होत्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर केटली यांनी प्रशिक्षक म्हणून कारकीर्द सुरू केली. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या महिला संघांमध्ये त्यांनी वरिष्ठ प्रशिक्षक पदांवर काम केलं आहे. लिसा या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पूर्ण वेळ महिला प्रशिक्षकपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या कोच आहेत. ज्यांनी इंग्लंड महिला संघाचं पूर्णवेळ प्रशिक्षकपद सांभाळलं.

द हंड्रेड’ स्पर्धेतील नॉर्दर्न सुपरचार्जर्स संघाच्या कोच म्हणून त्यांनी अलीकडेच जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या संघाने विजेतेपद पटकावलं. याशिवाय त्यांनी महिला बिग बॅश लीग (WBBL) मध्ये सिडनी थंडर संघाचेही प्रशिक्षकपद भूषवले असून, महिला क्रिकेटमधील त्यांचा अनुभव आणखी भक्कम झाला आहे.

नव्या भूमिकेबाबत बोलताना केटली म्हणाल्या की, WPL मधील ‘बेंचमार्क’ मानल्या जाणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाचा भाग होणं हे माझ्यासाठी सन्मानाचं आहे. तरुण आणि प्रतिभावान खेळाडूंसोबत काम करण्याची संधी मिळाल्याने मी उत्साहित आहे. मैदानावर आणि मैदानाबाहेर फ्रँचायझीची विजयी परंपरा पुढे नेण्याचा माझा प्रयत्न असेल.