Shafali Verma Clean Bold Video : नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात अव्वल स्थानासाठी रंगतदार सामना सुरु आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीच्या आख्ख्या संघाला मुंबईच्या गोलंदाजांनी १०५ धावांवर गारद केलं. मुंबईने दिल्ली पॉवर प्ले मध्येच खरी ताकद दाखवली. कारण मुंबईची फिरकीपटू सायका इशाकने दिल्लीच्या शफाली वर्माची दांडी गुल करत संघाला पहिली विकेट मिळवून दिली. दिल्लीची आक्रमक फलंदाज शफाली वर्मा ६ चेंडूत फक्त २ धावा करुन तंबूत परतली. इशाकने शफालीचा विकेट घेतल्याने मुंबईला दिल्लीवर टिच्चून मारा करता आला.

सायकाने शफालीला बाद केल्यानंतर दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंग आणि एलिस कॅप्सी यांना धावसंख्या वाढवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूत सायकाने शफालीला क्विन बोल्ड केलं. सायकाने टाकलेला चेंडूचा अचूक अंदाज शफालीला घेता आला नाही. त्यामुळे चेंडू थेट स्टंम्पवर लागला आणि शफालीचा त्रिफळा उडाला. शफालीच्या विकेटमुळं दिल्लीला पहिला धक्का बसला. सायकाने शफालीचा विकेट घेतल्याने तिच्या नावावर ७ विकेट्सची नोंद झाली आहे. ३ सामन्यातच सायकाने ७ विकेट घेण्याची चमकदार कामगिरी केली आहे. मुंबई इंडियन्ससाठी सायका प्रभावी गोलंदाज ठरली असून कर्णधार हरमनप्रीतला सायकाकडून अशाच प्रकारच्या भेदक गोलंदाजीची अपेक्षा आहे.

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: लवकरच सगळेजण हार्दिक पंड्याचे गोडवे गातील; कायरॉन पोलार्ड हार्दिकच्या मागे भक्कम उभा
Shikhar Dhawan and Shubman Gill
 IPL 2024, GT vs PBKS: पंजाबच्या फलंदाजांचा कस! आज गुजरात टायटन्सचे आव्हान; गिल, धवनकडे लक्ष
hardik pandya
हार्दिकच्या योजनांचे आश्चर्य! बुमराच्या वापरावरून स्मिथकडून मुंबई इंडियन्सच्या कर्णधारावर टीका
md siraj
बंगळुरूच्या गोलंदाजांकडून कामगिरीत सुधारणेची अपेक्षा! ‘आयपीएल’मध्ये आज पंजाब किंग्जचे आव्हान

नक्की वाचा – आश्विनच्या गोलंदाजीची ट्रेविस हेडला झाली डोकेदुखी, लॉलीपॉप चेंडूवर जडेजाने टाकला पंजा, त्या झेलचा Video व्हायरल

इथे पाहा व्हिडीओ

मुंबई इंडियन्सच्या सायका इशाकने १३ धावा देत 3 विकेट घेतल्या. तसेच इसी वँगनेही भेदक गोलंदाजी करून 3 विकेट घेतल्या आणि हेली मॅथ्यूजनेही १९ धावांमध्ये 3 विकेट्स घेण्याची अप्रतिम कामगिरी केली. मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला पॉवर प्ले मध्येच जखडून टाकले होते. शफाली वर्माची विकेट गेल्यानंतर दिल्लीची धावसंख्येत घसरण झाली. दिल्लीने पाच षटकांत २५ धावा केल्या. त्यामुळे दिल्लीला १८ षटकांमध्ये १०५ धावांपर्यंतच मजल मारता आली. कारण दिल्लीचे सर्व फलंदाज मुंबईच्या गोलंदाजांपुढे नांगी टाकत होते.