Mumbai Indians vs Delhi Capitals, WPL 2026: महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेला दमदार सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. शेवटच्या षटकापर्यंत सामना मुंबई इंडियन्सच्या हातात होता. पण शेवटच्या षटकात नादीन डी क्लार्कने चौकार षटकारांचा पाऊस पाडला आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला विजय मिळवून दिला. त्यामुळे मुंबईची विजयी सलामी देण्याची संधी थोडक्यात हुकली. आता मुंबईचा स्पर्धेतील दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध होणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल दोन्ही संघांची प्लेईंग ११? जाणून घ्या.

या स्पर्धेतील तिसरा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये खेळवला जाणार आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ या स्पर्धेतील पहिलाच सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर पहिला सामना गमावलेला मुंबई इंडियन्सचा संघ आपल्या पहिल्या विजयाच्या प्रयत्नात असणार आहे.

कसा आहे दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड?

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आतापर्यंत ७ वेळा आमनेसामने आले आहेत. यादरम्यान मुंबई इंडियन्सने ३ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. तर दिल्ली कॅपिटल्सने ४ सामने जिंकले आहेत. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघाचं पारडं जड आहे. हा सामना जिंकून मुंबईचा संघ पहिला विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहेत. यासह हेड टू हेड रेकॉर्ड ४-४ ने बरोबरीत आणण्याच्या प्रयत्नात असणार आहेत.

या सामन्यासाठी अशी असू शकते मुंबई इंडियन्स संघाची प्लेईंग ११:

हेली मॅथ्यूज, नेट सिव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमनजोत कौर, अमेलिया केर, जी कमलिनी (यष्टिरक्षक), शबनीम इस्माइल, सईका इशाक, सजीवन सजना, संस्कृती गुप्ता, पूनम खेमनार.