DRS Blunder Viral Video : महिला प्रीमियर लीगमध्ये काल रविवारी ब्रेब्रॉन स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात सामना रंगला. यूपीने दिलेलं १६० धावांचं लक्ष्य गाठून मुंबईने या लीगमध्ये सलग चौथा विजय मिळवला. पण मुंबईची इनिंग सुरु असताना चौथ्या षटकात सामन्याला वेगळीच कलाटणी लागली. कारण डीआरएस ब्लंडर असल्याचं पाहायला मिळालं. सोफी एक्लेस्टनने चौथ्या षटाकातील पाचव्या चेंडू फुलर लेंथवर टाकला आणि हेली मॅथ्यूजने या चेंडूवर डिफेंस केलं. पण यूपी वॉरियर्सने LBW ची अपील केली. त्यानंतर अंपायरने फलंदाज नॉट आऊट असल्याचा निर्णय दिला. मात्र, मॅथ्यूजच्या बॅटच्या मधोमध चेंडू लागल्याचं रिव्यू मध्ये दिसलं.

याशिवाय LBW तपासण्यात आलं आणि त्यानंतर मॅथ्यूजला आऊट दिलं. हे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. एव्हढं झाल्यानंतरही हेलीने मैदान सोडलं नाही. हेलीला हा निर्णय संशयास्पद असल्याचं वाटलं. त्यानंतर पुन्हा एकदा DRS तपासण्यात आलं. तेव्हा असं लक्षात आलं की, दुसऱ्या चेंडूचा डीआरएस दाखवण्यात येत होता. त्यानंतर मात्र अंपायरला त्याचा निर्णय बदलावा लागला आणि मॅथ्यूजला नॉट आऊट देण्यात आलं. त्याआधी हेलीला रन आऊटचं एक जीवदान मिळालं होतं.

Jos Buttler's record-breaking century
KKR vs RR : जोस बटलरचं धोनी-कोहलीबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाला, “ते दोघे ज्या प्रकारे शेवटपर्यंत…”
Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
Rr Vs Gt Ipl 2024 Sanju Samson 50th Match As Captain
RR vs GT : संजू सॅमसनने ५०व्या सामन्यात केला खास पराक्रम, ‘या’ बाबतीत रोहित शर्मासह तीन कर्णधारांना टाकले मागे
Who is Angkrish Raghuvanshi
IPL 2024 : कोण आहे अंगक्रिश रघुवंशी? ज्याने सुनील नरेनच्या साथीने दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची केली धुलाई

नक्की वाचा – ‘WTC’ च्या फायनलमध्ये भारताची एन्ट्री! गूड न्यूज मिळताच विराटने मैदानातच केलं असं काही…Video झाला व्हायरल

इथे पाहा व्हिडीओ

क्रिकेट इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं की, एखाद्या अंपायरने डीआरएस निर्णय बदलण्यासाठी थर्ड अंपायरने मैदानातील अंपायरच्या निर्णयाला अंतिम ठरवलं आणि मैदानातील अंपायरने पुन्हा एकदा डीआरएस घेतला. या डीआरएसचा व्हिडीओ व्हायरल होताच ट्वीटरवर अनेकांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सकडून कर्णधार हरमनप्रीत कौर ( नाबाद ५३ धावा) आणि नेट सिवर ब्रंटने (नाबाद ४५ धावा) तिसऱ्या विकेटसाठी १०६ धावांची भागिदारी केली. मुंबईने १७.१ षटकात २ विकेट्स गमावत १६० धावांचं लक्ष्य गाठलं आणि यूपीचा पराभव केला.