scorecardresearch

मुंबईची गुजरातशी सलामी; अल्टिमेट खो-खो लीगचा पहिला हंगाम आजपासून

भारताच्या पारंपरिक खो-खो खेळाचे नवे स्वरुप समोर आणणाऱ्या अल्टिमेट खो-खो लीगच्या पहिल्या हंगामाला रविवारीपासून प्रारंभ होणार आहे.

मुंबईची गुजरातशी सलामी; अल्टिमेट खो-खो लीगचा पहिला हंगाम आजपासून
प्रतिनिधिक छायाचित्र

पुणे : भारताच्या पारंपरिक खो-खो खेळाचे नवे स्वरुप समोर आणणाऱ्या अल्टिमेट खो-खो लीगच्या पहिल्या हंगामाला रविवारीपासून प्रारंभ होणार आहे. पहिल्या सामन्यात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुंबई खिलाडीजची गाठ गुजरात जायंट्सशी पडणार आहे. म्हाळुंगे बालेवाडी क्रीडा संकुलातील बॅडिमटन हॉलमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. मुंबई संघाचे नेतृत्व विजय हजारे करणार असून, राजेश कुमार या संघाचा प्रमुख खेळाडू आहे. गुजरात संघाची धुरा रंजन शेट्टीवर असेल.

आजचे सामने

  • मुंबई खिलाडीज वि. गुजरात जायंट्स      

    (सायं. ७ वा.)

  • चेन्नई क्वीक गन्स वि. तेलुगु योद्धाज       

    (रात्री. ९ वा.)

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbai opens gujarat first season ultimate kho kho league starts today ysh

ताज्या बातम्या