मुंबई, पुण्याला ‘आयपीएल’साठी प्राधान्य!; ‘बीसीसीआय’च्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय; २७ मार्चपासून स्पर्धा रंगण्याची शक्यता

करोनामुळे भारतात सध्या अनेक ठिकाणी क्रीडा सामन्यांच्या आयोजनावर बंदी घालण्यात आली आहे.

‘बीसीसीआय’च्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय; २७ मार्चपासून स्पर्धा रंगण्याची शक्यता

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १५व्या हंगामाचे आयोजन करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मुंबई आणि पुणे शहराला प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. २७ मार्चपासून प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत ‘आयपीएल’ खेळवण्यात येण्याची शक्यता आहे.

मुळे आम्ही प्रामुख्याने मुंबईत ही स्पर्धा खेळवण्याचा विचार करत आहोत, असे ‘बीसीसीआय’चे सचिव जय शहा यांनी सांगितले. मुंबईतील वानखेडे, ब्रेबॉर्न, डी. वाय पाटील या तीन स्टेडियमसह पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर सामने खेळवता येऊ शकतात. भारतात स्पर्धेचे आयोजन करणे शक्य न झाल्यास अमिराती किंवा दक्षिण आफ्रिका येथे १५वा हंगाम खेळवण्याचा अखेरचा पर्याय आहे.

लिलावासाठी १,२१४ खेळाडूंची नोंदणी

‘आयपीएल’च्या १५व्या हंगामासाठी खेळाडूंची लिलावप्रक्रिया १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बेंगळूरु येथे होणार आहे. या लिलावासाठी एकूण १,२१४ खेळाडूंनी नोंदणी केली आहे. यामध्ये ८९६ भारतीय आणि ३१८ विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. ८९६पैकी ६१ खेळाडूंनी भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे, तर विदेशातील ३१८पैकी २०९ खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे. ऑस्ट्रेलियाच्या सर्वाधिक ५९ खेळाडूंनी लिलावासाठी नोंदणी केली आहे.

राहुलला १७, तर हार्दिकला १५ कोटी

नवी दिल्ली : ‘आयपीएल’च्या आगामी हंगामात प्रथमच सहभागी होणाऱ्या लखनऊ आणि अहमदाबाद संघाचे नेतृत्व अनुक्रमे के. एल. राहुल आणि हार्दिक पंड्या करणार असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब करण्यात आले. लखनऊने राहुलला तब्बल १७ कोटी रुपयांना करारबद्ध केले असून ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मार्कस स्टोयनिसचा ९.२ आणि फिरकीपटू रवी बिश्नोईचा ४ कोटी रुपयांमध्ये संघात समावेश करण्यात आला. अहमदाबादच्या हार्दिक आणि फिरकीपटू रशीद खानला प्रत्येकी १५ कोटी देण्यात येतील, तर शुभमन गिलला सात कोटी रुपयांत करारबद्ध केले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbai pune preferred for ipl important decision in bcci meeting akp

Next Story
ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : त्सित्सिपास, सबालेंका विजयी; संघर्षानंतर उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश; मेदवेदेव, श्वीऑनटेकची आगेकूच
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी