इराणी चषक जिंकला; मुंबईविरुद्ध ४८० धावांचा यशस्वी पाठलाग

फलंदाजांच्या दिमाखदार सांघिक कामगिरीच्या जोरावर शेष भारत संघाने इराणी चषक क्रिकेट स्पर्धेत मुंबईविरुद्ध ४८० धावांचे लक्ष्य पेलत जेतेपदाची कमाई केली.  शेष भारत संघाने  २६व्यांदा चषकावर नाव कोरले.

चौथ्या डावात ४८० धावांचे प्रचंड लक्ष्य मिळालेल्या शेष भारताने पाचव्या दिवशी १ बाद १०० धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली. सलामीवीर फैझ फझलने १२७ धावांची खेळी करत विजयाचा पाया रचला. सुदीप चॅटर्जी (५४), करुण नायर  (९२) आणि शेल्डन जॅक्सन (नाबाद ५९) यांनीही निर्णायक खेळ केला.

संक्षिप्त धावफलक

मुंबई : ६०४ आणि १८२ पराभूत विरुद्ध शेष भारत : ३०६ आणि ६ बाद ४८२ (फैझ फझल १२७, करुण नायर ९२, शेल्डन जॅक्सन नाबाद ५९; इक्बाल अब्दुल्ला ५/१५४)

सामनावीर : करुण नायर