Musheer Khan Health Update Shared Video with father: मुंबई क्रिकेट संघाचा उत्कृष्ट फलंदाज आणि सलामीवीर मुशीर खान याचा रस्ते अपघात झाल्याने तो काही काळासाठी क्रिकेटच्या मैदानापासून लांब राहणार आहे. मुंबई क्रिकेट संघाला लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर १ ते ५ ऑक्टोबर दरम्यान रेस्ट ऑफ इंडिया संघाविरुद्ध इराणी चषक सामना खेळायचा आहे. याबाबत मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीएने आधीच आपला संघ जाहीर केला होता, ज्यामध्ये युवा स्टार खेळाडू मुशीर खानच्या नावाचाही समावेश होता. पण मुशीरचा अपघात झाल्याने मुंबई संघालाही त्याच्या अनुपस्थितीचा धक्का बसला आहे. मुशीर खान आणि त्याचे वडील नौशाद खान यांनी एक व्हीडिओ शेअर केला आहे.

हेही वाचा – WTC Points Table: श्रीलंकेमुळे ऑस्ट्रेलियाचा WTC अंतिम फेरीचा मार्ग खडतर; कसोटी मालिकेत न्यूझीलंड संघावर मिळवला एकतर्फी विजय

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

मुशीर खानचा अपघात कसा झाला?

मुशीर खान इराणी चषकापूर्वी सरावाकरता त्याच्या घरी आझमगड इथे गेला होता. सामन्यात भाग घेण्यापूर्वी मुशीर आझमगड येथील त्याच्या घरी होता जिथे तो सामन्यासाठी तयारी करत होता. यानंतर २७ सप्टेंबर रोजी मुशीर व त्याचे वडिल लखनौला रवाना झाले, त्यात त्यांच्या कारला अपघात झाला. एक्सप्रेस वे वर कार दुभाजकाला धडकून पलटी झाली. ज्यात मुशीर खानच्या मानेला दुखापत झाली. त्याला लखनौच्या मेदांता हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले.

आता मुशीरने स्वत: चाहत्यांना त्याच्या स्थितीबद्दल माहिती दिली ज्यामध्ये त्याने त्याचे वडील नौशाद खान यांच्याबरोबर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. सर्फराज खानने हा व्हीडिओ त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.

हेही वाचा – ENG vs AUS: हॅरी ब्रुकने मोडला विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड, ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेत इतक्या धावा करत रचला विक्रम

कार अपघातानंतर मुशीर खानने आपल्या प्रकृतीबद्दल दिलेल्या व्हिडिओ अपडेटमध्ये तो म्हणाला की, “मला हे नवीन आयुष्य मिळाले यासाठी मी देवाचे आभार मानू इच्छितो. आता मी सध्या ठीक आहे आणि माझे वडील पण माझ्याबरोबर होते, त्यामुळे ते पण आता ठीक आहेत. तुम्ही सर्वांनी माझ्यासाठी जी प्रार्थना केली आणि मला पाठिंबा दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.”

दरम्यान, मुशीरचे वडील नौशाद म्हणाले की, “या नव्या आयुष्यासाठी सर्वप्रथम मी देवाचे आभार मानतो. तसेच आमच्यासाठी प्रार्थना करणारे सर्व लोक, आमचे हितचिंतक, आमचे चाहते, आम्ही सर्वांचे आभार मानतो. तसेच मी आमच्या MCA आणि BCCI चे आभार मानू इच्छितो जे मुशीरची पूर्ण काळजी घेत आहेत आणि मुशीरच्या तब्येतीबद्दल कोणतीही अपडेट देखील त्यांच्याकडूनच येतील.”

हेही वाचा – IPL Auction 2025: विदेशी खेळाडूंवर वचक बसवण्यासाठी BCCI ची युक्ती, आयपीएलमध्ये ‘हा’ नियम मोडल्यास दोन वर्षांची बंदी

कार अपघातानंतर मुशीरला लखनौच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुशीरला मानेचाला खूप वेदना होत होता, ज्यात त्याने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये त्याने मानेचा पट्टा लावल्याचेही दिसत आहे. मुशीर खान प्रवास करण्यासाठी फिट झाल्यानंतर मुंबईत येणार आहे आणि मुंबईत त्याच्यावर पुढील उपचार करण्यात येणार आहेत.

Story img Loader