कर्णधार ऋतुराज गायकवाडने (३० चेंडूंत ५१ धावा) साकारलेल्या अर्धशतकानंतरही महाराष्ट्राला सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. फिरकीपटू मुरुगन अश्विानच्या प्रभावी कामगिरीमुळे तमिळनाडूने महाराष्ट्रावर १२ धावांनी मात केली.

एलिट-अ गटातील या लढतीत प्रथम फलंदाजी करताना कर्णधार विजय शंकर (नाबाद ४२) आणि साई सुदर्शन (३५) यांनी दिलेल्या योगदानामुळे तमिळनाडूने २० षटकांत ४ बाद १६७ अशी धावसंख्या उभारली. महाराष्ट्राकडून सत्यजित बच्छावने दोन बळी मिळवले.

लक्ष्याचा पाठलाग करताना ऋतुराज आणि यश नाहर (१७) यांनी सात षटकांतच ५८ धावांची सलामी दिली. परंतु ऋतुराज बाद झाल्यावर महाराष्ट्राचा डाव कोसळल्याने त्यांना २० षटकांत ६ बाद १५५ धावांपर्यंतच मजल मारता आली. अश्विानने ऋतुराज आणि यश यांचे बळी मिळवून तमिळनाडूच्या विजयाची पायाभरणी केली. महाराष्ट्राची आता शुक्रवारी पंजाब संघाशी गाठ पडणार आहे.

संक्षिप्त धावफलक

तमिळनाडू : २० षटकांत ४ बाद १६७ (विजय शंकर नाबाद ४२, साई सुदर्शन ३५; सत्यजित बच्छाव २/३५) विजयी वि. महाराष्ट्र : २० षटकांत ६ बाद १५५ (ऋतुराज गायकवाड ५१, नौशाद शेख २२; मुरुगन अश्विान २/१८)

’ गुण : तमिळनाडू ४, महाराष्ट्र ०