भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार आणि अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेकडे आगामी सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबईच्या संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

डावखुरा अष्टपैलू अर्जुन तेंडुलकर दुखापतीमुळे गुवाहाटी येथे ४ नोव्हेंबरपासून रंगणाऱ्या या स्पर्धेला मुकणार आहे. सलील अंकोला यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने मुंबईचा २० जणांचा चमू जाहीर करताना पृथ्वी शॉकडे उपकर्णधारपदाची सूत्रे सोपवली आहेत. गतवर्षी मुंबईवर मुश्ताक अली स्पर्धेत साखळीतच गारद होण्याची नामुष्की ओढावली. त्यानंतर विजय हजारे स्पर्धेत पृथ्वीच्या नेतृत्वाखाली मुंबईने जेतेपद मिळवले.

मुंबईचा संघ

अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे, आदित्य तरे, सर्फराज खान, अरमान जाफर, हार्दिक तामोरे, तुषार देशपांडे, अथर्व अंकोलेकर, शाम्स मुलानी, धवल कुलकर्णी, सिद्धेश लाड, प्रशांत सोळंकी, अमान खान, मोहित अवस्थी, साईराज पाटील, तनुष कोटियन, दीपक शेट्टी, रॉयस्टन डायस.