मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा : महाराष्ट्राचा सलग तिसरा विजय

केदार जाधव (नाबाद ५२) आणि काझी (नाबाद ३१) यांनी फटकेबाजी केल्याने महाराष्ट्राने १९० धावांचा टप्पा ओलांडला.

नौशाद शेख

लखनऊ : नौशाद शेखच्या (५५ धावा आणि तीन बळी) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्राने सोमवारी सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत पुदुचेरीचा ११७ धावांनी धुव्वा उडवत सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली.

एलिट ‘अ’ गटातील या सामन्यात महाराष्ट्राने दिलेल्या १९४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पुदुचेरीचा डाव १३.५ षटकांत अवघ्या ७६ धावांत आटोपला. कर्णधार दामोदरन रोहित (१६) वगळता पुदुचेरीचा एकही फलंदाज १५ धावांचा टप्पा पार करू शकला नाही. महाराष्ट्राकडून अझीम काझी आणि नौशादने प्रत्येकी तीन गडी बाद केले.

तत्पूर्वी, महाराष्ट्राने २० षटकांत ३ बाद १९३ धावांची मजल मारली होती. कर्णधार ऋतुराज गायकवाड (३) लवकर बाद झाल्यावर यश नाहर (४४) आणि नौशाद (५५) यांनी दुसऱ्या गडय़ासाठी ७३ धावांची भागीदारी रचली. मग केदार जाधव (नाबाद ५२) आणि काझी (नाबाद ३१) यांनी फटकेबाजी केल्याने महाराष्ट्राने १९० धावांचा टप्पा ओलांडला.

संक्षिप्त धावफलक

महाराष्ट्र : २० षटकांत ३ बाद १९३ (नौशाद शेख ५५, केदार जाधव नाबाद ५२; रघू शर्मा २/३४) विजयी वि. पुदुचेरी : १३.५ षटकांत सर्वबाद ७६ (दामोदरन रोहित १६; नौशाद शेख ३/९, अझीम काझी ३/१८

’ गुण : महाराष्ट्र ४, पुदुचेरी ० नौशाद शेख

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mushtaq ali trophy maharashtra beat pondicherry zws

ताज्या बातम्या