scorecardresearch

संपूर्ण जग कौतुक करत असताना वॉर्नर मात्र विल्यमसनच्या कामगिरीवर झाला फिदा; Insta Story चा Screenshot व्हायरल

एकीकडे जगभरातून वॉर्नरवर कौतुकाचा वर्षाव होत असताना वॉर्नर मात्र एका वेगळ्याच खेळाडूच्या कामगिरीवर फिदा झालाय.

Kane Williamson David Warner
सध्या या इन्स्टाग्राम स्टोरीची सोशल नेटवर्किंगवर चर्चा आहे

तो आला… त्याने पाहिलं आणि जिंकून घेतलं सारं काही… या अशा मोजक्या शब्दांमध्ये वर्णन करता येईल अशी कामगिरी मागील काही आठवड्यांमध्ये टी-२० विश्वचषक विजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलियन संघातील सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने केलीय. याच भन्नाट कामगिरीसाठी त्याला २०२१ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेमधील मालिकावीर पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. ‘आयपीएल’मधील सुमार कामगिरीमुळे वॉर्नरची सनरायजर्स हैदराबाद संघाच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्याबरोबरच अखेरच्या काही सामन्यांसाठी त्याला वगळण्यात आल्यानंतर मुख्य स्पर्धेत वॉर्नरने केलेल्या दमदार पुनरागमनामुळे तो चांगलाच चर्चेत आहे. एकीकडे जगभरातून वॉर्नरवर कौतुकाचा वर्षाव होत असताना वॉर्नर मात्र एका वेगळ्याच खेळाडूच्या कामगिरीवर फिदा झालाय. त्याने थेट इन्स्टाग्राम स्टोरीमधून याबद्दल भाष्य केलं आहे.

नक्की वाचा >> T20 World Cup: शोएब अख्तर म्हणतो, “वॉर्नरला मालिकावीर पुरस्कार देण्याचा निर्णय अन्यायकारक, हा पुरस्कार तर…”

विश्वचषक स्पर्धेमध्ये तीन अर्धशतकांसह २८९ धावा करणाऱ्या वॉर्नरने ऑस्ट्रेलियाला जेतेपद मिळवून देण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली. डेव्हिड वॉर्नरला मालिकावीराचाही किताब मिळाला. त्याने ७ डावात ४८ च्या सरासरीने २८९ धावा केल्या. तसेच ३ अर्धशतके ठोकली. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १४७ होता. वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद ८९ धावांची त्याची सर्वात मोठी खेळी खेळली. टी-२० विश्वचषकाच्या शेवटच्या तीन डावात वॉर्नरने अनुक्रमे ८९ (नाबाद), ४९ आणि ५३ धावा केल्या. म्हणजेच संघाच्या गरजेच्या वेळी त्याने स्वतःला सिद्ध केलं. त्यामुळेच वॉर्नरवर कौतुकाचा वर्षाव होतोय. पण वॉर्नरने मात्र त्याचा सनरायजर्स हैदराबाद संघाचा सहकारी आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनचा फोटो आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीला ठेवला असून त्याला एक भन्नाट कॅप्शन दिलीय.

नक्की वाचा >> विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर ‘तो’ म्हणाला, “३३५ दिवस”; पण या ट्विटचा अर्थ काय?

भावा तू लीजण्ड म्हणजेच महान खेळाडू आहेस, अशा अर्थाची कॅप्शन वॉर्नरने विल्यमसनला मिठी मारतानाचा फोटो पोस्ट करताना दिली आहे. यामध्ये त्याने विल्यमसनचं इन्स्टाग्राम हॅण्डलही टॅग केलं आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच विश्वचषक जिंकल्यानंतर वॉर्नरचं अभिनंदन करताना विल्यमसन आणि वॉर्नरने एकमेकांना मिठी मारत शब्बासकी दिलेली. हाच क्षण वॉर्नरने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट केलाय. वॉर्नरच्या या इन्स्टा स्टोरीचा स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाला असून चाहते या दोघांनी एकमेकांबद्दल दाखवलेल्या समान्मानासाठी त्याचं कौतुक करताना दिसत आहेत. पाहुयात त्यापैकीच काही ट्विट्स…

१)

२)

३)

४)

नक्की वाचा >> UAE वरुन परतणाऱ्या हार्दिक पांड्याला कस्टमचा दणका; मुंबई विमानतळावर जप्त करण्यात आली पाच कोटींची घड्याळं

दरम्यान, स्पर्धेमधील आपल्या कामगिरीबद्दल बोलताना वॉर्नरने, “टीकाकारांची तोंडे बंद करण्यापेक्षा स्वत:ला सिद्ध करण्याच्या जिद्दीमुळेच सूर गवसला व टी-२० विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडू ठरण्यात मला यश आले. आयपीएलमधील अपयशामुळे मला स्वत:लाच माझ्या क्षमतेविषयी विविध प्रश्नांनी भेडसावले. परंतु मी खचलो नाही. विश्वचषकात फक्त मूलभूत घटकांवर भर दिला. त्यामुळे स्वत:ला सिद्ध केल्याचा अभिमान आहे,” असं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-11-2021 at 11:43 IST
ताज्या बातम्या