मेलबर्न : गतविजेता तसेच अग्रमानांकित जोकोव्हिच सोमवारपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेला मुकणार हे स्पष्ट झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जोकोव्हिचला या स्पर्धेत २१ ग्रँडस्लॅम जेतेपदांच्या विक्रमाला गवसणी घालण्याची संधी होती. त्याने ऑस्ट्रेलियन स्पर्धेवर वर्चस्व गाजवले असून विक्रमी नऊ वेळा आणि सलग तीनदा ही स्पर्धा जिंकली आहे. मात्र, आता त्याच्या अनुपस्थितीत स्पेनच्या राफेल नदालला विक्रमाची संधी चालून आली आहे. जोकोव्हिचप्रमाणेच नदालच्या खात्यावरही २० ग्रँडस्लॅम जेतेपदे आहेत. नदालला रशियाचा डॅनिल मेदवेदेव्ह, ग्रीसचा स्टेफानोस त्सित्सिपास आणि जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव्ह यांचे कडवे आव्हान असेल. सोमवारी पहिल्या फेरीत नदालचा मार्कोस गिरॉनशी सामना होईल. महिलांमध्ये अग्रमानांकित अ‍ॅश्ले बार्टी, गतविजेती नाओमी ओसाका, आर्यना साबालेंका यांच्यात जेतेपदासाठी चुरस पाहायला मिळेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nadal has a golden opportunity in djokovic absence akp
First published on: 17-01-2022 at 00:16 IST