नामिबियाचा ऐतिहासिक विजय

‘अ’ गटाच्या प्राथमिक फेरीतील सामन्यात त्यांनी नेदरलँड्सला सहा गडी आणि सहा चेंडू राखून पराभूत केले. १६५ धावांचे लक्ष्य नामिबियाने १९ षटकांत गाठले.

अबू धाबी : एकेकाळी दक्षिण आफ्रिकेकडून खेळणाऱ्या डेव्हिड वीजने (४० चेंडूंत नाबाद ६६ धावा आणि १ बळी) केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर नामिबियाने बुधवारी ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील पहिलावहिला विजय नोंदवला.

‘अ’ गटाच्या प्राथमिक फेरीतील सामन्यात त्यांनी नेदरलँड्सला सहा गडी आणि सहा चेंडू राखून पराभूत केले. १६५ धावांचे लक्ष्य नामिबियाने १९ षटकांत गाठले. ३ बाद ५२ धावांवरून कर्णधार जेरार्ड इरास्मससह (३२) चौथ्या गड्यासाठी ९३ धावांची भागीदारी रचून नामिबियाचे ‘अव्वल-१२’ फेरीच्या शर्यतीतील आव्हान टिकवले. सलग दुसऱ्या पराभवामुळे नेदरलँड्सला मात्र स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Namibia recorded the first victory in the history of the twenty20 world cup akp

Next Story
रसिका , सारा , सुधांशु, आदित्य यांची विजयी सलामी
ताज्या बातम्या