Nana Patekar Passes Away 1983 World Cup Team Dream Unfulfilled: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं वयाच्या ७५व्या वर्षी गोव्यामध्ये निधन झालं. मध्यरात्री अचानक अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. नाना पाटेकरांच्या अकाली जाण्याने सर्वच जण हळहळले आहेत. कलाकार, राजकारणी, क्रीडा क्षेत्र ते सर्वच जणांना त्यांच्या निधनामुळे धक्का बसला आहे. क्रिकेटप्रेमी असलेले नाना पाटेकर यांचं एक स्वप्न मात्र अपूर्ण राहिलं.

नाना पाटेकर यांनी रेडिओ सिटी दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या अभिनयाविषयी बोलताना त्यांनी क्रिकेटचा विषय काढला होता. नाना पाटेकर हे माजी खेळाडू सुनील गावस्कर यांना आपला आदर्श मानतात. एकाग्र होणं म्हणजे काय हे सुनील गावस्करांनी त्यांच्या खेळातून दाखवलं. सुनील गावस्कर आमचा हिरो असंही त्यांनी म्हटलं. पण १९८३च्या भारताच्या विश्वचषक विजेत्या संघाला आपल्या शेतावर राहायला बोलवण्याचं त्यांचं स्वप्न मात्र अधुरं राहिलं.

नाना पाटेकर यांना त्यांच्या पुण्यातील शेतघरात १९८३च्या विश्वचषक विजेत्या संघाला बोलवायचं होतं आणि त्यांच्यासोबत वेळ घालवत क्रिकेटच्या गप्पा रंगवायच्या होत्या. पण नानांच्या अकाली एक्झिटने त्यांचं हे स्वप्न मात्र अपूर्ण राहिलं.

नानांनी रेडिओ सिटीच्या मुलाखतीत म्हटलं होतं की, “अजूनही सुनील (गावस्कर) आणि आम्ही भेटतो. आम्ही छानपैकी म्हणजे वर्षातून २-४ वेळेस तरी नक्की भेटतो आणि छान मस्त मजेत असतो. क्रिकेट हे माझं वेड आहे. कधी मोहिंदर (मोहिंदर अमरनाथ) येतो, कधी सुनील येतो. आता आमचं ठरलंय की आपल्या शेतावर अख्खी जी १९८३ च्या वर्ल्डकपची जी टीम आहे, त्यांनी सगळ्यांनी एकत्र यायचं, म्हणजे आताचे कोण असतील तेही येतील. पण ८३च्या संघातील ते सगळे, म्हणजे राहून, सगळं राहायचं रात्री तिथे….”

नाना पाटेकर यांचं पुण्याजवळ डोणजे गावात शेतघर आहे. त्यांच्या ग्लॅमरस आयुष्यापासून दूर, निसर्गाच्या सान्निध्यातला त्यांचा आवडता विसावा. या शेतघरात शेती, जनावरं आणि साध्या पद्धतीचं राहणीमान यामुळे नानांचा गावाकडच्या जीवनाशी असलेला जिव्हाळा दिसून येतो. त्यांचं हे शेतघर केवळ स्वतःपुरतं मर्यादित नसून, नाना आपल्या जवळच्या मित्रमंडळी आणि परिचितांचंही तिथे आपुलकीने स्वागत करत असत. अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय मंडळींनीही या ठिकाणी भेट दिल्याचं समोर आलं आहे. देवेंद्र फडणवीस दिवंगत अजित पवार यांनी एकत्र नानांच्या शेतघराला दिलेल्या भेटीचे फोटो, व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळाले होते.