Nana Patekar Playing Cricket Viral Video: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी (८ ऑक्टोबर) पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या नानांनी गोव्यात अखेरचा श्वास घेतला. गोव्यातील मणिपाल रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आलं. पुण्यात शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अभिनयासह नाना पाटेकर यांना क्रिकेटची देखील आवड होती. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नाना पाटेकर हे भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीच्या फलंदाजीचे चाहते होते. अभिनयाच्या रंगमंचावर आपल्या डायलॉग्सने तुफान फटकेबाजी करणारे नाना पाटेकर उत्तम क्रिकेट खेळायचे. माध्यमातील वृत्तानुसार, सुरुवातीच्या काळात ते उत्तम ऑफ स्पिनर होते. दादरमधील शिवाजी पार्क मैदानावर ते क्रिकेट खेळायचे. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितलं होतं की, विराट कोहली आऊट झाला की, मला जेवण करायची इच्छा होत नाही. यावरून दिसून येतं की, त्यांचं क्रिकेटवर किती प्रेम होतं.
नाना पाटेकरांचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये नाना पाटेकर क्रिकेटच्या मैदानावर फलंदाजी करताना दिसून येत आहेत. पण फलंदाजी करताना ते दुसऱ्याच चेंडूवर बाद झाले. लवकर बाद झाल्यानंतर त्यांनी जे उत्तर दिलं, ते ऐकण्यासारखं होतं.
बाद झाल्यानंतर नाना पाटेकर म्हणाले, “तू पाहिलंस ना मला फलंदाजी करताना? कशी होती माझी फलंदाजी? मजा तर आली ना? खरंच मजा तर खूप येते. मला पण लवकर आऊट व्हायचं नव्हतं. पण मी विचार केला की, माझ्या मागे खेळणारे खूप फलंदाज आहेत. त्यामुळेच मी वाकडे तिकडे फटके मारले आणि आऊट झालो. जर मी २० षटकं एकटाच फलंदाजी करत राहिलो, तर ते योग्य वाटणार नाही. बघूया आता किती धावा होतात. जर १२० धावा झाल्या तर नक्कीच आम्ही जिंकू. मी खूप चांगला गोलंदाज आहे. जी गोष्ट आपल्याला जमत नाही, ती गोष्ट करायला जास्त मजा येते.” नाना पाटेकरांचा हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका सेलिब्रिटी क्रिकेट सामन्यादरम्यानचा आहे.
