Bollywood actor Nana Patekar calls cricket legend Sunil Gavaskar his acting role model: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झालं. राहत्या घरी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना तात्काळ रूग्णालयात नेण्यात आलं, पण त्यांची प्राणज्योत मालवली. मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या कामाचा ठसा उमटवणारे नाना पाटेकर यांच्या एक्झिटने सर्वांनाच धक्का बसला आहे. फक्त मनोरंजनसृष्टी नव्हे तर इतर सर्व क्षेत्रातील दिग्गज मंडळींशी कमालीची मैत्री जपणारे नाना पाटेकर दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना आपला अभिनयातील आदर्श मानत होते. याबाबत त्यांनी स्वत: मुलाखतीत सांगितलं होतं.
नाना पाटेकर व सुनील गावस्कर ही दोन्ही नावं आपआपल्या क्षेत्रातील दिग्गज मंडळी आहेत. अशातच आता सुनील गावस्करांच्या खेळाचं कौतुक करत नाना पाटेकरांनी त्यांच्या खेळाविषयीचे काही पैलू सांगितले. यामुळेच सुनील गावस्कर हे त्यांचा अभिनयातील आदर्श का आहेत, याची माहिती त्यांनी दिली.
नाना पाटेकर यांनी रेडिओ सिटीला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या अभिनयाविषयी बोलताना त्यांनी सुनील गावस्करांचं उदाहरण दिलं. नाना पाटेकर यांचे अनेक चित्रपट अजरामर झाले, पण त्यांनी कोणत्या निकषावर चित्रपट निवडले याबाबत सांगताना त्यांनी संवाद हे सहज वाटावे, स्वाभाविक वाटावे असं मी निवडायचो. यादरम्यान सहजपणाबद्दल सांगताना त्यांनी सुनील गावस्करांच्या फलंदाजीचं उदाहरण दिलं.
नाना पाटेकर म्हणाले, “सहजपणा हा जगामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. सुनील गावस्करला खेळताना पाहिल्यावर असं वाटतं याला भरतनाट्यम येतंय, कथ्थकली येतंय त्याचा पदन्यास बघितल्यानंतर त्याचा जो त्या ज्या पद्धतीने खेळायचा, अरे बापरे! पण सचिन तेंडुलकर अप्रतिम बॅट्समन, म्हणजे जगामधला थोर बॅट्समन आहे. पण आमचा हिरो सुनील गावस्कर. सुनील गावस्कर ज्या लोकांबरोबर खेळला, त्या दोघांची (सचिन तेंडुलकर व सुनील गावस्करांची) उंची कदाचित सारखी असेल माहीत नाही. पण सुनील गावस्कर म्हणजे बापरे तो ज्या पद्धतीने खेळायचा.”
“सुनीलचं मी सांगतो, इमरान खानचं एक स्टेटमेंट होतं, या माणसाला बाऊन्सर कशासाठी टाकायचा. कारण बाऊन्सर टाकल्यानंतर तो असा फक्त मागे होता आणि असा जाणाऱ्या बॉलकडे पाहत बसतो. इतका फास्ट बाऊन्सर तो असा शांतपणे पाहत राहायचा. सुनीलला विचारल्यानंतर तू कसा काय एवढ्या मोठमोठ्या गोलंदाजांना खेळतो. तो म्हणाला, मी बॉलर्सच्या विरूद्ध खेळलोच नाही, मी फक्त बॉलच्या विरूद्ध खेळलो. केवढं छान स्टेटमेंट आहे हे…. तो बॉल आहे त्याला मला मारायचंय, त्या बॉलरला थोडी मारायचं आहे. त्या चेंडूबरोबर माझा सामना होता, चेंडू टाकणाऱ्याबरोबर कधीच सामना नव्हता.”
नाना पाटेकर सुनील गावस्करांना आदर्श का मानतात?
नाना पाटेकर पुढे म्हणाले, “सुनील गावस्कर हा माझा आदर्श आहे. तुमचा अॅक्टिंगमधला आदर्श कोण, तर मी म्हणतो सुनील गावस्कर. कारण एकाग्र होणं म्हणजे काय हे त्याच्या खेळातून त्याने मला शिकवलं. अजूनही सुनील आणि मी रेग्युलर भेटतो. आम्ही छानपैकी म्हणजे वर्षातून २-४ वेळेस तरी नक्की भेटतो आणि छान मस्त मजेत असतो. क्रिकेट हे माझं वेड आहे. कधी मोहिंदर (मोहिंदर अमरनाथ) येतो, कधी सुनील येतो. आता आपल्या शेतावर अख्खी जी १९८३ च्या वर्ल्डकपची जी टीम आहे, त्यांनी सगळ्यांनी एकत्र यायचं, म्हणजे आताचे कोण असतील तेही येतील. पण ८३च्या संघातील ते सगळे, तिथे राहायला येतील. तिथे ते सगळे रात्री राहतील.”
