वुमन्स प्रीमियर लीगमध्ये आज मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरू यांच्यात सामना खेळवला जात आहे. आरसीबीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात मुंबईकडून हिने वादळी फलंदाजी करत शतक झळकावलं. या शतकासह तिने इतिहास घडवला.
मुंबई इंडियन्सने या सामन्यात शानदार फलंदाजी करत धावांचा डोंगर उभारला. मुंबईकडून हिली mathews आणि सजना सजीवनची जोडी उतरली होती. सजना लवकर बाद झाली, पण हिलीची बॅट तळपली आणि तिने अर्धशतक झळकावलं. हिलीने ३९ चेंडूत ९ चौकरांसह ५६ धावांची खेळी केली. यानंतर हरमनप्रीत कौर २० धावा करत बाद झाली. तर नॅटने मात्र शेवटपर्यंत नाबाद राहत शानदार शतक झळकावलं. Nat ने ५७ चेंडूत १६ चौकार व एक षटकारासह १०० धावा करत शानदार शतक झलकावल. यासह मुंबईने प्रथम फलंदाजी करताना १९९ धावा केल्या.
नॅट स्किव्हर ब्रंट ही वुमन्स प्रीमियर लीग इतिहासात शतक करणारी पहिली खेळाडू ठरली आहे. एका महत्त्वाच्या सामन्यात, नॅट स्किव्हर-ब्रंटने फक्त ५७ चेंडूत शतक ठोकलं आणि WPL इतिहासात तिचं नाव सुवर्णअक्षरांनी कोरलं. सलग चार हंगामात, अनेक फलंदाज नव्हर्स नानईन्टीजमध्ये बाद होत होते. कधी ९९ धावा तर कधी ९६ धावांवर फलंदाज बाद झाले. पण नॅट स्किव्हरने मात्र तीन अंकी आकडा गाठला आणि शतक पूर्ण केलं.
WPL मध्ये सर्वात मोठी खेळी करणाऱ्या फलंदाज
१०० धावा – नॅट स्किव्हर ब्रंट
९९ धावा – जॉर्जिया वॉल
९९ धावा – सोफी डिव्हाईन
९६ धावा – एलिसा हिली
९६ धावा – बेथ मूनी
९६ धावा – स्मृती मानधना
