राष्ट्रीय कॅरम स्पर्धा : गतविजेते प्रशांत, रश्मी चौथ्या फेरीत

महिलांमध्ये पाटणाच्या रश्मी कुमारीने ऑटोमिक एनर्जीच्या अक्षता खोतचा २५-०, २५-० असा फडशा पाडला

रश्मी कुमारी

श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे सुरू असलेल्या ४४व्या राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत बुधवारी गतविजेता प्रशांत मोरे आणि रश्मी कुमारी यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीची चौथी फेरी गाठली.

पुरुष एकेरीत महाराष्ट्राच्या प्रशांतने तेलंगणाच्या यू. नरेशवर २४-२०, २५-१८ अशी मात केली. मात्र माजी विश्वविजेत्या योगेश परदेशीला उत्तर प्रदेशच्या अब्दुल रेहमानकडून २४-२५, १८-९, ७-२१ असा पराभव पत्करावा लागल्याने त्याचे आव्हान संपुष्टात आले. याव्यतिरिक्त, महाराष्ट्राच्या राजेश गोहिलने आसामच्या अजित दासवर १७-१३, २०-१४ असा विजय मिळवला. तर निसार अहमदने एअर इंडियाच्या एम. नटराजला २५-९, २१-१७ अशी धूळ चारून पुढील फेरीत आगेकूच केली.

महिलांमध्ये पाटणाच्या रश्मी कुमारीने ऑटोमिक एनर्जीच्या अक्षता खोतचा २५-०, २५-० असा फडशा पाडला. पेट्रोलियम क्रीडा मंडळाच्या काजल कुमारीने भानू दास मेढीचा २५-०, २५-० असा धुव्वा उडवला.

महाराष्ट्राच्या मैत्रेयी गोगटे हिने एम. खजिमा हिच्यावर ६-२०, २५-०, २२-१७ अशी चुरशीच्या लढतीत सरशी साधून चौथ्या फेरीत प्रवेश केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: National carrom competition past winner prashant rashmi in fourth round abn

Next Story
सचिन संपलेला नाही!