scorecardresearch

राष्ट्रीय कॅरम स्पर्धा : महाराष्ट्राला सांघिक जेतेपद

दादर येथील हालारी विसा ओसवाल समाज हॉल येथे सुरू असलेल्या ४९व्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत महिलांच्या आंतरराज्य सांघिक गटात महाराष्ट्राने तमिळनाडूवर २-१ असा विजय मिळवत जेतेपद प्राप्त केले.

आंतरराज्य स्पर्धेतील विजेता महाराष्ट्राच्या महिलांचा संघ. डावीकडून समृद्धी घाडिगावकर, श्रुती सोनावणे, केशर निर्गुण, वीणा चव्हाण (संघ व्यवस्थापक). मैत्रेयी गोगटे, आकांक्षा कदम व प्राजक्ता नारायणकर दिसत आहेत.

मुंबई : दादर येथील हालारी विसा ओसवाल समाज हॉल येथे सुरू असलेल्या ४९व्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत महिलांच्या आंतरराज्य सांघिक गटात महाराष्ट्राने तमिळनाडूवर २-१ असा विजय मिळवत जेतेपद प्राप्त केले. महिलांमध्ये तमिळनाडूच्या जे. अभिन्याने महाराष्ट्राच्या आकांक्षाला २१-१६, २४-११ असे नमवून संघाला चांगली सुरुवात करून दिली. परंतु चुरशीची झुंज देत महाराष्ट्राच्या केशर निर्गुणने तमिळनाडूच्या अविष्काला ५-२५, २५-१५, २५-० असे पराभूत करून बरोबरी साधली. मग दुहेरीत महाराष्ट्राच्या श्रुती सोनावणे व मैत्रेयी गोगटेने तमिळनाडूच्या एल. अम्मा शवर्थिनी व वी मिथराला जोडीला १५-११, १६-२२, १७-१५ असे हरवले.  आंतरसंस्था सांघिक गटात पेट्रोलियम क्रीडा मंडळाने दुहेरी यश मिळवले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: National carrom tournament team title for maharashtra winner victory ysh

ताज्या बातम्या