रत्नागिरी : आर. बी. सप्रे स्मृती फिडे मानांकन राष्ट्रीय जलद बुद्धिबळ स्पर्धेत मुंबईच्या मोहम्मद नुबेरशहा शेखने ८.५ गुणांसह विजेतेपद पटकावले. पुण्याचा फिडेमास्टर निखिल दीक्षितने ८ गुणांसह उपविजेतेपद मिळवले. नुबेरशहाने कोल्हापूरच्या सम्मेद शेटेचा पराभव करून जेतेपदाचा चषक उंचावला. सम्मेदला ७ गुणांसह सहाव्या स्थानावर जावे लागले. तमिळनाडूचा आंतरराष्ट्रीय मास्टर आर. बालसुब्रह्मण्यम आणि निखिल दीक्षित यांनी डावात धोका न पत्करता डाव बरोबरीत सोडवला. बालसुब्रह्मण्यमला ७.५ गुणांसह तृतीय क्रमांक मिळाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुष्कर डेरेने कोल्हापूरच्या श्रीराज भोसलेचा पराभव केला. पुष्करने ७.५ गुणांसह चौथे स्थान मिळवले. कोल्हापूरच्या अनिश गांधीने पुण्याचा फिडेमास्टर अनिरुद्ध देशपांडेचा पराभव केला. अनिशला ७.५ गुणांसह सहावे स्थान आणि अनिरुद्धला सातवे स्थान मिळाले. नीलेश माळी आणि रत्नागिरीच्या ओम लामकाणे यांनी धोका न पत्करता डाव बरोबरीत सोडवला. दोघांनाही ६.५ गुण मिळाले.

ओमला १२वा आणि नीलेशला १३वा क्रमांक मिळाला. मुंबईच्या संजीव मिश्राने सोहम पवारचा पराभव करून ८वे स्थान मिळवले. ओम कदमने गोवर्धन वासवेचा पराभव करून ७ गुणांसह नववे स्थान मिळवले.मुंबईच्या केतन बोरुचाने गोव्याच्या आर्यन रायकरचा पराभव करून ६.५ गुणांसह दहावे स्थान मिळवले. अवधूत पटवर्धनने कोल्हापूरच्या आदित्य सावळकरचा पराभव करून ७ गुणांसह १६०० ते १९०० मानांकन गटात प्रथम क्रमांक पटकावला.

उत्कृष्ट मानांकने (गटवारी)

  •  १६०० ते १९०० : अवधूत पटवर्धन, गजानन जायदे, श्रीराज भोसले, विनय गांधी
  •  १३०० ते १६०० : प्रदीप सुतार, प्रतीक गेजगे, आदित्य सावळकर
  • १००० ते १३०० : आफताब हलवाई, साईराज वेर्णेकर, सारंग पाटील
  •  बिगर मानांकित : अनिकेत खेडेकर, दिया सवाल, सौरिश काशीळकर
  •  १५ वर्षांखालील : गुंजल चोपडेकर, ऋषिकेश परब, याहीन बोरुचा
  •  १३ वर्षांखालील : अरविंद अय्यर, हद्दीन महान, शुभेष सहस्रबुद्धे
  •  ९ वर्षांखालील : विराज राणे, शिवनाथ व्याम, सर्वेश दामले
  •  ७ वर्षांखालील : आरव पाटील, अर्णव पाटील, नभ मणिक

रत्नागिरीतील विजेते

१५ वर्षांखालील मुले व मुली- क्रिश डोईफोडे, ओंकार सावर्डेकर, अक्षय मयेकर, आदिती पाटील, युक्ता कांबळे; १३ वर्षांखालील मुली – सुमेधा मांगले, आरोही सावंत;  ११ वर्षांखालील मुली – दिव्या पाटील, अस्मिता रॉय ;  ९ वर्षांखालील मुली – अशिना मोदी; ७ वर्षांखालील मुली – आरोही पाटील, शर्वरी पाटील;  ज्येष्ठ खेळाडू- सुहास कामटेकर, दिलीप कुलकर्णी, प्रसाद मंजुनाथ; उत्कृष्ट महिला खेळाडू – तन्वी हडकोणकर, मुक्ताई देसाई, श्रेया दाईगडे

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National fast chess competition akp
First published on: 21-01-2020 at 01:41 IST