अहमदाबाद : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सोमवारी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. सायकलिंगमध्ये महाराष्ट्राने सांघिक, वेटलिफ्टिंगमध्ये कोमल वाळके, ट्रॅम्पोलिनमध्ये आदर्श भोईर, डायव्हिंगमध्ये ऋतिका श्रीरामने सुवर्णपदकाची कमाई केली. खो-खो क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी अंतिम फेरी गाठली. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सायकलिंगमध्ये मयूरी लुटेचा समावेश असलेल्या महाराष्ट्राच्या संघाने सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेतील हे मयूरीचे तिसरे पदक ठरले. मयूरीने यापूर्वी वैयक्तिक कांस्य आणि सुवर्णपदक पटकावले होते. मयूरीने सांघिक स्प्रिंट प्रकारात शशिकला आगाशे आणि आदिती डोंगरेच्या साथीने तीन फेऱ्यांची शर्यत ५२.७२३ सेकंदांत पूर्ण केली. वेटलिफ्टिंगमध्ये कोमल वाकळेने ८७ किलो गटात सुवर्णपदक पटकावले. कोमलने स्नॅचमध्ये ९४ किलो, तर क्लीन अ‍ॅण्ड जर्कमध्ये ११६ किलो असे एकूण २१० किलो वजन उचलले.

संजीवनीबाबत आज निर्णय

संजीवनी जाधवने दहा हजार मीटर शर्यतीत ३० मिनिटे ४०.५१ सेकंद अशा वेळेसह सुवर्णपदक कमावले. मात्र धावताना संजीवनीचा पाय एकदा ट्रॅकला भेदून दुसऱ्या रेषेमध्ये गेला. अन्य संघांनी यावर आक्षेप घेतल्याने संजीवनीला अपात्र ठरविण्यात आले. मात्र महाराष्ट्र संघाने या निर्णयाविरुद्ध दाद मागितली आहे. या संदर्भात तक्रार निवारण समितीची मंगळवारी दुपारी बैठक होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National games 2022 maharashtra cycling team won gold medal zws
First published on: 04-10-2022 at 05:36 IST