अहमदाबाद : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी डायव्हिंग प्रकारात मेधाली रेडरकर, तर स्पर्धेत प्रथमच समावेश करण्यात आलेल्या योगासन प्रकारात वैभव श्रीरामने महाराष्ट्राच्या सुवर्णपदकांत भर टाकली. तसेच डायव्हिंगमध्येच ऋतिका श्रीराम कांस्यपदकाची मानकरी ठरली. हे तिचे यंदाच्या स्पर्धेतील तिसरे पदक होते. महाराष्ट्राचे पदकतालिकेत तिसरे स्थान कायम असून, आतापर्यंत महाराष्ट्राने २६ सुवर्ण, २५ रौप्य आणि ४८ कांस्य अशी ९९ पदके मिळविली आहेत.

योगासन स्पर्धा प्रकारात वैभव श्रीरामने पारंपरिक आसन प्रकारात विभक्त विपरीत शलभासन, परिवर्त शिव लिंगरासन, एकपाद त्रिमुकूटत्तानासन, कैलासआसन, उर्दमुख टीटीभासन अशी आसने सहज करताना ६१.८४ गुणांसह सुवर्णपदक मिळविले. छकुली सेलोकरने महिलांच्या पारंपरिक योगासनात ६२.३४ गुणांसह रौप्यपदक मिळविले. छकुलीने विभक्त विपरीत शलभासन, परिवर्त शिव लिंगरासन, वामदेव त्रिपुरासन, कैलासआसन, उर्दमुख टीटीभासन ही पारंपारिक योगासने सादर केली.

Lok Sabha elections, physical test,
लोकसभा निवडणुकीमुळे ‘पीएसआय’च्या शारीरिक चाचणी लांबणीवर; एमपीएससीचा निर्णय
national boxing championship marathi news
नागपूरच्या समीक्षा, अनंतने जिंकले राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक
Sachin Tendulkar Investment
‘आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स’ महाराष्ट्रात पाच हजार कोटींची गुंतवणूक करणार, सचिन तेंडुलकरचाही सहभाग!
Dead body of tiger in suspicious condition near international cricket stadium
नागपूर : आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमजवळ वाघाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह

जलतरणात चार बाय शंभर मीटर मिश्र फ्री-स्टाईल शर्यतीत महाराष्ट्राने ३ मिनिट ४७.६१ सेकंदांसह रौप्यपदक मिळविले. महाराष्ट्राच्या संघात वेदांत माधवन, अवंतिका चव्हाण, दिवा पंजाबी व हीर शहाचा समावेश होता.  ज्युडो स्पर्धेत अपूर्वा पाटीलला ७८ किलोपेक्षा अधिक वजनी गटाच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करला. मात्र ती कांस्यपदकाची मानकरी ठरली. त्यापूर्वी अपूर्वाने मणिपूरच्या रोशनी देवी आणि तमिळनाडूच्या देवधर शनीचा पराभव केला होता. उपांत्य फेरीत अपूर्वाला पंजाबच्या मनप्रीतने पराभूत केले. बॉक्सिंग प्रकारात मणिपूरच्या ओजीबालाकडून महाराष्ट्राच्या  आर्याला, तर पुरुषांच्या ६० किलो वजन गटात हरिवंशला सेनादलाच्या हितेश कुमारकडून एकतर्फी लढतीत पराभवाचा सामना करावा लागला.

पदकतालिका

क्र. राज्य  एकूण

१   सेनादल        ४२   ३१   २७   १००

२ हरयाणा           २९    २३    २३    ७५

३   महाराष्ट्र      २६    २६   ४८   १००