अहमदाबाद : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी डायव्हिंग प्रकारात मेधाली रेडरकर, तर स्पर्धेत प्रथमच समावेश करण्यात आलेल्या योगासन प्रकारात वैभव श्रीरामने महाराष्ट्राच्या सुवर्णपदकांत भर टाकली. तसेच डायव्हिंगमध्येच ऋतिका श्रीराम कांस्यपदकाची मानकरी ठरली. हे तिचे यंदाच्या स्पर्धेतील तिसरे पदक होते. महाराष्ट्राचे पदकतालिकेत तिसरे स्थान कायम असून, आतापर्यंत महाराष्ट्राने २६ सुवर्ण, २५ रौप्य आणि ४८ कांस्य अशी ९९ पदके मिळविली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

योगासन स्पर्धा प्रकारात वैभव श्रीरामने पारंपरिक आसन प्रकारात विभक्त विपरीत शलभासन, परिवर्त शिव लिंगरासन, एकपाद त्रिमुकूटत्तानासन, कैलासआसन, उर्दमुख टीटीभासन अशी आसने सहज करताना ६१.८४ गुणांसह सुवर्णपदक मिळविले. छकुली सेलोकरने महिलांच्या पारंपरिक योगासनात ६२.३४ गुणांसह रौप्यपदक मिळविले. छकुलीने विभक्त विपरीत शलभासन, परिवर्त शिव लिंगरासन, वामदेव त्रिपुरासन, कैलासआसन, उर्दमुख टीटीभासन ही पारंपारिक योगासने सादर केली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National sports competition medal vaibhav won gold yoga ysh
First published on: 08-10-2022 at 01:18 IST