अहमदाबाद : महाराष्ट्राच्या अग्रमानांकित मालविका बनसोडला गुरुवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील बॅडिमटन प्रकारात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तसेच तिरंदाज गौरव लांबेने सहा तासांच्या अंतराने रौप्य आणि कांस्यपदक मिळविले. बॅडिमटनमधील महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात अग्रमानांकित मालविकाने दुसऱ्या मानांकित छत्तीसगडच्या आकर्शी कश्यपकडून ८-२१, २०-२२ अशी हार पत्करली.

तिरंदाजीत गौरव लांबेने दोन पदके मिळविली. गौरवने चारुलतासोबत रिकव्‍‌र्हच्या मिश्र दुहेरीत रौप्यपदक जिंकले. अंतिम लढतीत महाराष्ट्राच्या जोडीला हरयाणाविरुद्ध टायब्रेकरमध्ये २७-२८ असा पराभव पत्करावा लागला. महाराष्ट्राचे हे तिरंदाजीतील सहावे पदक ठरले. गौरवने सकाळच्या सत्रात सांघिक रिकव्‍‌र्ह गटात कांस्यपदक मिळविले होते. महाराष्ट्राच्या अनुज शहाने पुरुषांच्या एक मीटर स्प्रिंग बोर्ड प्रकारात कांस्यपदक पटकावले. निखिल दुबेने बॉक्सिंगमध्ये विजयी सलामी देताना राजस्थानच्या प्रितेश बिश्नोईला ४-१ असे नमवले. रेनॉल्ड जोसेफने आसामच्या रोशन सोनारविरुद्ध ५-० असा एकतर्फी विजय मिळविला.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : मालविकाला रौप्यपदक

पदकतालिका

क्र. राज्य एकूण

१   सेनादल        ४०   २५   २४   ८९

२     हरयाणा           २५    २२    १९    ६६

३   महाराष्ट्र      २४    २२   ४२   ८८