S Badrinath rant about Indian team selection criteria : श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. ऋतुराज गायकवाडला या दौऱ्यासाठी टीम इंडियात स्थान मिळालेले नाही. झिम्बाब्वे दौऱ्यावर तो संघात होता पण श्रीलंकेला जाणार नाही. या प्रकरणी काही लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज आणि टीम इंडियाकडून खेळलेल्या एस बद्रीनाथने ऋतुराजची निवड न करण्यावर संतापला आहे. त्याने या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. त्याचबरोबर संघ निवडीबाबत एक मोठे वक्तव्य केलं आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऋतुराज गायकवाडला भारती संघाचे भविष्य मानले जात आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. आयपीएलमध्येही तो खूप धावा करत आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो आणि संघाचा कर्णधार आहे. या उजव्या हाताच्या फलंदाजाने झिम्बाब्वे दौऱ्यावरही चांगली कामगिरी केली पण तरीही त्याला श्रीलंका दौऱ्यासाठी एकदिवसीय आणि टी-२० या दोन्ही संघातून वगळण्यात आले. धोनीच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या तामिळनाडूच्या सुब्रमण्यम बद्रीनाथने गायकवाडला वगळण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. सध्या त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो म्हणत आहे की, टीम इंडियामध्ये निवड हवी असेल तर शरीरावर टॅटू आणि बॉलीवूड अभिनेत्रीशी रिलेशन, अशा गोष्टी खेळाडूकडे असाव्यात. हेही वाचा - Hardik Pandya : घटस्फोट आणि कर्णधारपदाच्या हुलकावणीनंतर हार्दिकची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाला, ‘कधीकधी मन…’ एस बद्रीनाथ काय म्हणाला? 'क्रिक डिबेट विथ बद्री' या विषयावर बोलताना एस बद्रीनाथ म्हणाला, "जेव्हा रिंकू सिंग, ऋतुराज गायकवाडसारख्या खेळाडूंची भारतीय संघात निवड होत नाही. तेव्हा असं वाटतं की तुम्हाला वाईट माणसाच्या प्रतिमेची गरज आहे. यावरुन असं दिसतं आहे की तुम्ही बॉलिवूड अभिनेत्रीशी रिलेशनमध्ये असायला हवं. त्याचबरोबर एक चांगला मीडिया मॅनेजर आणि शरीरावर टॅटू असायला हवेत." रिंकू सिंगला श्रीलंका दौऱ्यासाठी टी-२० संघात स्थान मिळाले असले तरी त्याचे नाव वनडे संघात नाही. हेही वाचा - Team India : आशिया कपमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का, ‘मॅच विनर’ खेळाडू संपूर्ण स्पर्धेतून बाहेर या दौऱ्यासाठी सूर्यकुमार यादवला भारताच्या टी-२० संघाचे कर्णधार बनवण्यात आले आहे. मात्र, संघ निवडीवर जोरदार टीका होत आहे. या दौऱ्यासाठी रियान परागला दोन्ही संघात स्थान मिळाले आहे, तर झिम्बाब्वे दौऱ्यात त्याची कामगिरी खराब होती. सूर्यकुमारकडे टी-२० मध्ये कर्णधारपद सोपवण्यात आले असले तरी त्याचे नाव वनडे संघात नाही. तसेच हार्दिक पांड्याने वनडे संघातून माघार घेतली आहे.