लुसान डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत शुक्रवारी ८९.०८ मीटर भाला फेकत नीरज चोप्राने पहिला क्रमांक पटकावला आहे. या कामगिरीनंतर झुरिचमध्ये होणाऱ्या अंतिम फेरीसाठी त्याने आपले स्थान निश्चित केले आहे.

हेही वाचा – ‘फिफा’ची भारतावरील बंदी मागे; कुमारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनाचा मार्ग मोकळा

या स्पर्धेत नीरजने ८९.०८ मीटर भाला फेकत पहिला क्रमांक पटकावला. तत्पूर्वी त्याला दुसऱ्या प्रयत्नात ८५.१८ मीटर भाला फेकता आला. तर तिसरा आणि पाचवा प्रयत्न सोडत शेवटच्या प्रयत्नात त्याने ८०.०४ मी भाला फेकला.

हेही वाचा – बेन्झेमा, पुटेयासला ‘युएफा’च्या सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार

स्नायूंच्या दुखापतीतून सावरत नीरज पुन्हा मैदानात परतला आहे. जुलै महिन्याच्या अखेरीस ओरेगॉन येथे झालेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपदरम्यान नीरजच्या मांडीला दुखापत झाली होती. परिणामी, त्याला बर्मिंगहॅममधील CWG 2022 मधून माघार घ्यावी लागली होती.