Neeraj Chopra Wins NC Classic watch Video: भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने अजून एका स्पर्धेचं जेतेपद आपल्या नावे केलं आहे. नीरज चोप्राने आयोजित केलेला नीरज चोप्रा क्लासिक या स्पर्धेच्या पहिल्या सीझनचं जेतेपद आपल्या नावे केलं आहे. बेंगळुरू येथे झालेल्या स्पर्धेत भारतीय स्टार खेळाडूने ८६.१८ मीटर लांब भालाफेक केली आणि इतर कोणताही फिरकीपटू नीरजच्या हा आकडा पार करू शकला नाही. नीरजने तिसऱ्या थ्रोमध्ये हा आकडा गाठला.

बेंगळुरू येथे झालेल्या स्पर्धेत, भारताच्या गोल्डन बॉयनंतर केनियाचा ज्युलियस येगो ८४.५१ मीटरसह दुसऱ्या क्रमांकावर आणि श्रीलंकेचा रमेश पाथिरागे ८४.३४ मीटरसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला. तर भारताचा सचिन यादव चौथ्या क्रमांकावर राहिला.

नीरज चोप्रा क्लासिक स्पर्धा पाहण्यासाठी बंगळुरूच्या श्री कांतिर्वा स्टेडियममध्ये सुमारे १५ हजार लोक उपस्थित होते. विजयानंतर नीरजने प्रेक्षकांची भेट घेतली. त्याने सांगितलं की वारा भालाफेक करण्याच्या विरुद्ध दिशेने वाहत होता. त्यामुळे भाला फार दूर जाऊ शकला नाही. नीरज म्हणाला, इथे मोठ्या संख्येने प्रेक्षक आले होते आणि हे पाहून त्याला खूप आनंद झाला. नीरजने सांगितलं की तो केवळ या स्पर्धेत खेळत नव्हता तर अनेक गोष्टींमध्ये सहभागी होता. त्यामुळे, हा त्याच्यासाठी खूप वेगळा अनुभव होता.

नीरज पहिला थ्रो टाकण्यासाठी मैदानावर आला. चाहत्यांनी त्याला चीयर करत त्याला प्रोत्साहन दिलं. पण त्याचा पहिला थ्रो फाउल झाल्याने त्याची सुरूवात चांगली झाली नाही. यानंतर, त्याने दुसऱ्या थ्रोमध्ये आपली सर्व ताकद पणाला लावली आणि ८२.९९ मीटरचा थ्रो फेकला. यासह त्याने आघाडी घेतली. यानंतर, त्याने तिसऱ्या थ्रोमध्ये ८६.१८ मीटरचा थ्रो फेकला आणि आपली आघाडी अधिक मजबूत केली.

नीरज चोप्राचा चौथा थ्रो देखील फाऊल होता. त्यानंतर पाचव्या थ्रोमध्ये त्याने एकूण ८४.०७ मीटर थ्रो फेकला. त्याचा शेवटचा थ्रो ८२.२२ होता. एनसी क्लासिक स्पर्धेत कोणताही खेळाडू त्याची बरोबरी करू शकला नाही.

नीरज चोप्रा हा भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये दोन पदकं जिंकणारा एकमेव खेळाडू आहे. त्याने टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये सुवर्णपदक आणि पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये रौप्यपदक जिंकले. भालाफेकच्या जगात त्याने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एनसी क्लासिक स्पर्धेपूर्वी, नीरजने त्याचे प्रशिक्षक, चेक प्रजासत्ताकचे महान भालाफेकपटू जान झेलेझनी (९८.४८ मीटरचा जागतिक विक्रम असलेले) यांचा सन्मान केला. एनसी क्लासिक यापूर्वी पंचकुला, हरियाणा येथे होणार होते. पण प्रकाश व्यवस्था नसल्याने ही स्पर्धा बंगळुरूमध्ये करण्यात आली.