Neeru Dhanda Won Gold Medal In Womens Trap Shooting Event: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. नेमबाजीत भारतीय खेळाडूंनी आणखी एका पदकाला गवसणी घातली आहे. नेमबाज नीरू धांडाने इतिहासाला गवसणी घातली आहे. नीरू धांडा ही महिलांच्या वैयक्तिक ट्रॅप शूटिंग इव्हेंटमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी पहिलीच खेळाडू ठरली आहे. नीरू धांडाने फायनलमध्ये ३० पैकी २८ अचूक निशाने साधले आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिल्या सुवर्ण पदकावर नाव कोरलं. तर रौप्यपदकाची कमाई करणाऱ्या चीनच्या यूनॉन्ग सुनने ३० पैकी २६ निशाने साधले. २८ अचून निशाने साधण्यासह नीरू धांडाने आशियाई विक्रम मोडून काढला आहे. याआधी आशियाई क्रीडा स्पर्धेत चीनी ताइपेच्या वान यू लियूने २४ अचून निशाने साधून हा विक्रम आपल्या नावावर केला होता. आता नीरू धांडाने हा विक्रम मोडून काढला आहे.
यासह नीरू धांडाने भारताची ३६ वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत १९९० मध्ये पहिल्यांदा महिलांच्या शॉटगन ट्रॅप वैयक्तिक इव्हेंटचा समावेश करण्यात आला होता. तेव्हापासून आतापर्यंत जितक्या स्पर्धा झाल्या, त्यामध्ये भारताला एकही पदक जिंकता आलं नव्हतं. २०२६ मध्ये आयची- नागोयामध्ये भारताने शूटिंग ट्रॅप इव्हेंटमध्ये पहिलं पदक पटाकावलं आहे. नीरू धांडाने भारतासाठी सुवर्णपदक पटकावलं आहे.
नीरू धांडाने मोडला आशियाई रेकॉर्ड
या पदकासह नीरू धांडाने आशियाई रेकॉर्ड मोडून काढला आहे.नीरूने ३० पैकी २८ अचूक निशाने साधले. याआधी महिलांच्या वैयक्तिक ट्रॅप स्पर्धेतील आशियाई रेकॉर्ड २४ गुणांचा होता. हा रेकॉर्ड चीनी ताइपेच्या वान यू लियूने १९ जानेवारी २०२६ मध्ये आपल्या नावावर केला होता. आता अवघ्या काही महिन्यांनंतर नीरू धांडाने हा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
