आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या क्रिकेट मालिकेतील पहिल्याच सामन्यात नेपाळने इतिहास रचला आहे. नेपाळने मंगोलियाविरुद्ध अवघ्या २० षटकात ३ गड्यांच्या बदल्यात तब्बल ३१४ धावांचा पर्वत उभा केला आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील ही सर्वात्त मोठी धावसंख्या आहे. तसेच टी-२० सामन्यात पहिल्यांदाच एखाद्या संघाने ३०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. या सामन्यात नेपाळच्या फलंदाजांनी अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. नेपाळच्या फलंदाजांनी सर्वात वेगवान शतक, सर्वात वेगवान अर्धशतक, तसेच एकाच डावात २६ षटकार असे अनेक विक्रम रचले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेपाळचा आघाडीचा फलंदाज कुशल मल्ला याने टी-२० क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतकाची नोंद केली आहे. त्याने अवघ्या ३४ चेंडूत शतक ठोकलं. तसेच दीपेंद्र सिंह ऐरी याने सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा पराक्रम केला आहे. त्याने अवघ्या ९ चेंडूत अर्धशतक लागवलं. दीपेंद्रने पहिल्या ६ चेंडूत ६ षटकार ठोकले.

दीपेंद्र सिंह १० चेंडूत ५२ धावा करून नाबाद राहिला. या खेळीत त्याने ८ उत्तुंग षटकार लगावले. या वेगवान अर्धशतकासह दीपेंद्रने भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहचा सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विक्रम मोडीत काढला आहे. युवराज सिंह याने २००७ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडविरोधात १२ चेंडूत अर्धशतक फटकावलं होतं. या सामन्यात युवराजने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याच्या एका षटकात ६ षटकार लगावले होते.

हे ही वाचा >> Asian Games 2023 : ४१ वर्षांचा दुष्काळ मिटला, घोडेस्वारांच्या सुवर्णपदकासह भारताची पदकतालिकेत मोठी झेप

दरम्यान, या सामन्यात नेपाळने प्रथम फलंदाजी करताना ३१४ धावांचा पर्वत उभा केला आहे. या डावात नेपाळच्या फलंदाजांनी तब्बल २६ षटकार आणि १४ चौकारांचा पाऊस पाडला. केवळ चौकार-षटकारांच्या मदतीने नेपाळच्या फलंदाजांनी २१२ धावा फटकावल्या. कुशल मल्ला ५० चेंडूत १३७ धावा करून नाबाद राहिला. त्याने १२ चौकार आणि ८ षटकार ठोकले. त्याचा स्ट्राईक रेट तब्बल २३७ इतका होता. तर दीपेंद्र सिंह याने ५२० च्या स्ट्राईक रेटने ५२ धावा फटकावल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nepal scores 314 runs fastest fifty and century asian games rohit sharma yuvraj singh record broken asc
Show comments