भारत इस्लामिक देश आहे का? बीसीसीआयच्या ‘त्या’ निर्णयावरून नेटिझन्स भडकले

येणाऱ्या वर्षात होणाऱ्या मोठ्या मालिका आणि आयसीसी इव्हेंटसाठी भारतीय खेळाडूंसाठी बनवण्यात आलेला डायट प्लॅन वादाचे कारण ठरला आहे

Netizens slam bcci making halal meat compulsory Indian cricket team new diet plan
(फोटो सौजन्य- BCCI / PTI )

भारतीय क्रिकेट संघाच्या नव्या डाएट प्लॅनवरून गदारोळ सुरू आहे. भारतीय संघाच्या क्रिकेटपटूंना फक्त हलाल मांस खाणे बंधनकारक केल्याबद्दल सोशल मीडियावरुन बीसीसीआयवर टीका होत आहे. ट्विटरवर #BCCI_Promotes_Halal या नावाने एक ट्रेंड सुरू आहे, ज्यामध्ये भारतीय क्रिकेट बोर्डावर ताशेरे ओढले जात आहेत. दोन दिवसांपूर्वी बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन आहार योजना तयार केल्याची माहिती समोर आली होती. क्रिकेटपटूंना या डायटचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. यामध्ये हलाल मांस खाण्यास सांगितले आहे.

प्रसारमाध्यमांमधील वृत्तानुसार, खेळाडूंना कोणत्याही प्रकारे पोर्क आणि बीफ खाण्याची परवानगी नाही. खेळाडूंची फिटनेस आणि तब्येत लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे. जर कोणाला मांस खायचे असेल तर ते फक्त हलाल मांस खाऊ शकतात. याशिवाय तुम्ही इतर कोणतेही मांस खाऊ शकत नाही.

येणाऱ्या वर्षात होणार्‍या मोठ्या मालिका आणि आयसीसी इव्हेंटमध्ये खेळाडूंना तंदुरुस्त ठेवण्यासाठी हा डायट प्लॅन खेळाडूंवर काटेकोरपणे लागू करण्यात येणार आहे. खेळाडूंचे वजन वाढणार नाही याचीही काळजी घेतली जाईल.

बायो बबलमध्ये राहिल्याने काही खेळाडूंना सतत क्रिकेट खेळण्यात अडचणी येत असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्याला सर्व फॉरमॅटमध्ये आपली उर्जा राखता आली नाही. अशा परिस्थितीत खेळाडूंना त्यांच्या आहारात काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे. ज्या खेळाडूंना मांसाहाराची आवड आहे आणि ते रोज खातात त्यांना विशेष लक्ष देण्यास सांगितले आहे.

बीसीसीआयवर सोशल मीडियावरून ताशेरे

बीसीसीआयवर सोशल मीडियावर हलाल मांस खाण्याची जाहिरात केल्याचा आरोप होत आहे. भाजपाच्या प्रवक्त्यांनी आणि हिंदुत्व संघटनांशी संबंधित ट्विटर अकाऊंटवरून याबाबत टीका केली जात आहे आहेत. यामध्ये बीसीसीआयला हा निर्णय मागे घेण्यास सांगितले आहे. हिंदू आणि शीख क्रिकेटपटूंना हलाल मांस खाण्याची सक्ती का केली जात आहे, असा प्रश्नही विचारला जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Netizens slam bcci making halal meat compulsory indian cricket team new diet plan abn

Next Story
सचिन संपलेला नाही!