WTC 2023 Final India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनच्या ओव्हल मैदानात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनलचा सामना सुरु आहे. दुसऱ्या दिवशीही येथील खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल असल्याचं पाहायला मिळालं. बुधवारी नाबाद राहिलेला फलंदाज ट्रेविस हेड (१६३) आणि स्टीव्ह स्मिथला दुहेरी शतक झळकावता आले नाही. स्मिथ १२१ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. कारण भारताचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरने वेगवान मारा करून त्याला बाद केलं आणि ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. शार्दूलने फेकलेला चेंडू डिफेन्स करताना स्मिथ क्लिन बोल्ड झाला. मराठमोळ्या शार्दूलने स्मिथला बाद केल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर मिम्सचा वर्षाव केला. नेटकऱ्यांनी मजेशीर मिम्स व्हायरल करत शार्दूलवर स्तुतिसुमने उधळली.

आजच्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. ऑस्ट्रेलियाचे धाकड फलंदाज स्मिथ (१२१) आणि हेडला (१६३) धावांवर बाद करून भारताने या इनिंगमध्ये कमबॅक केलं. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळं ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ४६९ धावांवर गडगडला. ऑस्ट्रेलियाने १२१. ३ षटकात सर्वबाद ४६९ धावांवर मजल मारली.

Virat Kohli And Umpire Argument Video
KKR vs RCB : आऊट दिल्यानंतर विराट कोहली संतापला, अंपायरशी वाद घालतानाचा VIDEO व्हायरल
several injured in multiple stabbing-shooting incident
सिडनीतल्या मॉलमध्ये चाकू हल्ला, चार जणांचा मृत्यू, अनेक लोक जखमी; संशियाताला पोलिसांनी ठार केल्याचं वृत्त
Dolly chaiwala in malvids video viral
Video : बिल गेट्सला चहा दिल्यानंतर मालदीवमध्ये फिरतोय डॉली चायवाला! मात्र नेटकरी झालेत नाराज…
Rishabh pant hitting bat screen video viral
IPL 2024, RR vs DC : ऋषभ पंतने आऊट झाल्यानंतर रागाच्या भरात असं काही केलं, ज्याचा VIDEO होतोय व्हायरल

नक्की वाचा – IND vs AUS, WTC 2023 Final: मोहम्मद शमीच्या वेगवान माऱ्यापुढं मार्नस लाबुशेनची दांडी गुल, पाहा जबरदस्त गोलंदाजीचा Video

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने चमकदार कामगिरी करत ४ विकेट्स घेतल्या. मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर रविंद्र जडेजाला एका विकेटवर समाधान मानावे लागले. ऑस्ट्रेलियासाठी वॉर्नरने ६० चेंडूत ४३ धावा केल्या. उस्मान ख्वाजा शून्यावर बाद झाला. लाबुशेन २६ धावा करून तंबूत परतला. स्मिथने शतकी खेळी करत १२१ धावा केल्या. तसच ट्रेविस हेडनेही १६३ धावांची शतकी खेळी केली. त्यानंतर अॅलेक्स कॅरीने ४८ धावा केल्या. या धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ४६९ धावांपर्यंत मजल मारली.