IPL मधील दोन नव्या संघांबाबतची महत्त्वाची माहिती आली समोर; ‘या’ तारखेला होणार लिलाव

IPLमध्ये आता आठऐवजी दहा संघ खेळवले जाणार.

New IPL team auction to take place on October 17
IPL मध्ये पुढच्या हंगामात दोन नवीन संघ येणार आहेत.

आयपीएलच्या १४व्या हंगामाचा दुसरा टप्पा यूएईमध्ये होणार आहे. १९ सप्टेंबरपासून ही स्पर्धा सुरू होईल. आठ फ्रेंचायझी आणि लीगशी संबंधित बहुतेक खेळाडू येथे पोहोचले आहेत. दुसरीकडे, आज मिळालेल्या माहितीनुसार, इंडियन प्रीमियर लीगसाठी दोन नवीन संघांचा लिलाव १७ ऑक्टोबर रोजी होणार आहे, तर ‘निविदा आमंत्रण’ ५ ऑक्टोबरपर्यंत खरेदी करता येतील. यासाठी २१ सप्टेंबर हा सर्व चौकशीसाठी शेवटचा दिवस असेल.

वृत्तसंस्था एएनआयने याबाबत माहिती दिली. ”आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने ३१ ऑगस्ट २०२१ रोजी दोन नवीन संघांच्या लिलावासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली होती. यानुसार, २०२२ मध्ये होणाऱ्या मेगा ऑक्शनमध्ये दोन नवीन संघांचा समावेश केला जाईल, त्यानंतर लीगमधील फ्रेंचायझींची संख्या १० पर्यंत वाढेल. जानेवारीमध्ये मेगा ऑक्शन घेतले जाऊ शकले.

 

हेही वाचा – HBD ‘SKY’ : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकणारा ‘वर्ल्ड क्लास बॅट्समन’!

पीटीआय या वृत्तसंस्थेने आधी सांगितले होते, की कोणतीही कंपनी ७५ कोटी रुपये देऊन बोली दस्तऐवज खरेदी करू शकते. यापूर्वी दोन नवीन संघांची मूळ किंमत १७०० कोटी रुपये मानली जात होती परंतु आता मूळ किंमत २००० कोटी रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार बीसीसीआयला किमान ५००० कोटींची अपेक्षा आहे. आयपीएलच्या पुढील हंगामात ७४ सामने होतील.

लीगचा कालावधी वाढणार

संघांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे प्रत्येक संघाला १४ किंवा १८ साखळी सामने खेळावे लागतील. प्रत्येक फ्रेंचायझीला घरच्या मैदानावर ७ सामने आणि दूरच्या ठिकाणी ७ सामने खेळावे लागतात. सध्या प्रत्येक संघाला प्रत्येकी ७ सामने खेळायला मिळतात. पण संघांच्या वाढीमुळे, जर प्रत्येक संघाला १८ सामने खेळायचे असतील, तर स्पर्धेची वेळ वाढेल. संघांना 2 गटांमध्ये विभागले जाईल.

अहमदाबाद, लखनऊ आणि पुणे हे देखील नवीन संघांचे आधार स्थान असतील. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम आणि लखनऊमधील एकाना स्टेडियम ही फ्रेंचायझींची निवड असू शकते, कारण या स्टेडियमची क्षमता अधिक आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: New ipl team auction to take place on october 17 adn