India vs New Zealand 4th T20I Match Result: न्यूझीलंड संघाने चौथ्या टी-२० सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करत भारताला पराभवाचा धक्का दिला आहे. न्यूझीलंड संघाने भारताचा धावांनी दारूण पराभव केला. ग्लेन फिलिप्स व मायकेल ब्रेसवल यांनी शतकी भागीदारी साकारली. तर फिलिप्सनेही शतक झळकावलं. त्यांच्या या खेळीच्या बळावर संघाने २५९ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात भारताची फलंदाजी चांगळीच कोसळली आणि संघ फक्त १ धावा करू शकला.

प्रथम फलंदाजी करताना, न्यूझीलंडने २० षटकांत २५९ धावा केल्या. प्रत्युत्तरात, भारतीय संघ केवळ १७२ धावाच करू शकला, ज्यामुळे त्यांना ८७ धावांनी पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंडच्या विजयाचा नायक ठरला ग्लेन फिलिप्स, ज्याने ४९ चेंडूंत १०७ धावा केल्या. याव्यतिरिक्त, मायकेल ब्रेसवेलने २५ चेंडूंत ६५ धावांची खेळी केली. या दोघांनी मिळून अवघ्या ४० चेंडूंत ११५ धावांची भागीदारी केली, ज्यामुळे भारतीय संघ पूर्णपणे सामन्यातून बाहेर फेकला गेला. गोलंदाजीमध्ये, जेकब डफीने उत्कृष्ट कामगिरी करत आपल्या ४ षटकांत २३ धावा देऊन ४ बळी मिळवले.

श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकताच न्यूझीलंड संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलं आणि संघाने टी-२० इतिहासातील आपली सर्वात मोठी धावसंख्या उभारली. भारताने पहिल्याच षटकात टीम सायफर्टची विकेट घेत दणक्यात सुरूवात केली. त्यानंतरही संघाने विकेट्स गमावले खरे, पण ग्लेन फिलिप्स व मायकेल ब्रेसवेल यांनी भारताच्या गोलंदाजांची शाळा घेतली.

भारताची आक्रमक फलंदाजी फळी आज पूर्णपणे अपयशी ठरली. संजू सॅमसन सर्वात आधी बाद झाला; सॅमसन आणि इशान किशन दोघेही पहिल्याच षटकात बाद झाले, इशानला खातंही उघडता आलं नाही. अभिषेक शर्मा आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी खेळपट्टीवर स्थिरावण्याचा प्रयत्न केला, परंतु पॉवरप्ले संपण्यापूर्वीच दोघेही बाद झाले. मॅथ्यू फिशरने २७ धावांवर अभिषेक शर्माला बाद केलं, तर ११ चेंडूंमध्ये २२ धावा करणारा कर्णधार श्रेयस अय्यर, ॲडम मिल्नेच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला.

मधल्या षटकांमध्ये अक्षर पटेल ७ धावा काढून बाद झाला. नितीश कुमार रेड्डीने आक्रमक फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, परंतु २१ धावांवर तो सँटनरचा बळी ठरला. नमन धीरनेही जलद फलंदाजी करत १३ चेंडूंत २८ धावा केल्या, पण त्यानंतर तो जेकब डफीच्या गोलंदाजीवर बाद झाला. डावाच्या उत्तरार्धात उपकर्णधार तिलक वर्माने ३५ धावा करत प्रयत्न केला, तरीही भारताला या सामन्यात मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला.

भारताच्या फलंदाजांपूर्वी गोलंदाजी विभागही फेल ठरला. न्यूझीलंड संघाने २० षटकांत २५९ धावा केल्या ही कोणत्याही संघाने भारताच्या विरोधात उभारलेली आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे. ग्लेन फिलिप्सच्या धडाकेबाज शतकाच्या बळावर न्यूझीलंडने हा टप्पा गाठला; त्याने १० षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने १०७ धावा केल्या. मायकेल ब्रेसवेलनेही मोलाचे योगदान देत अवघ्या २५ चेंडूत ६५ धावा फटकावल्या, ज्यामध्ये ६ षटकार आणि ४ चौकारांचा समावेश होता.

गोलंदाजांपैकी अक्षर पटेलने आपल्या ३ षटकांत ४३ धावा दिल्या. नितीश कुमार रेड्डीने ४ षटकांत ५४ धावा दिल्या. तर प्रिन्स यादवने ४९ धावा तर मयंक यादवने ४८ धावा दिल्या. तर अर्शदीपने ३८ धावा दिल्या.