New zealand vs Srilanka: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील सुपर ८ फेरीतील सामना श्रीलंका आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडला सुरूवातीला मोठे धक्के बसले होते. पण शेवटी मिचेल सँटनरने केलेल्या ४७ धावांच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने २० षटकांअखेर ७ गडी बाद १६८ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेला १०७ धावांपर्यंत मजल मारता आली. या पराभवासह श्रीलंकेचा संघ आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. तर न्यूझीलंडने सेमीफायनलमध्ये जाण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल टाकलं आहे.

या सामन्यात श्रीलंकेच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय श्रीलंकेच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला आणि न्यूझीलंडला सुरूवातीला मोठे धक्के दिले. एकापेक्षा एक स्टार फलंदाज असूनही न्यूझीलंडला १० धावा पूर्ण करण्यासाठी १७ व्या षटकापर्यंत वाट पाहावी लागली ८४ धावसंख्येवर न्यूझीलंडचे ६ फलंदाज तंबूत परतले होते. पण त्यानंतर न्यूझीलंडच्या फलदाजांनी जोर लावला आणि संघाची धावसंख्या १६८ धावांवर पोहोचवली. सलामीला आलेला टीम सैफर्ट अवघ्या ८ धावा करून माघारी परतला. तर फिन अॅलेनने २३ धावांचे योगदान दिले. रचिन रवींद्रने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण तो ३२ धावांवर माघारी परतला. त्यानंतर ग्लेन फिलिप्सने १८ धावांचे योगदान दिले. शेवटी मिचेल सँटनरने ४७ धावांची दमदार खेळी केली. त्याला कोल मॅककॉन्चीने चांगली साथ दिली. कोलने नाबाद ३१ धवांची खेळी केली. दोघांनी मिळून संघाची धावसंख्या ७ गडी बाद १६८ धावांवर पोहोचवली.

श्रीलंकेला हा सामना जिंकण्यासाठी १६९ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेला पहिल्याच चेंडूवर मोठा धक्का बसला. सलामीला आलेला निसंका गोल्डन डकवर माघारी परतला. तर कुसल मेंडिसने ११ धावा केल्या. चरिथ असलंका अवघ्या ५ धावांवर माघारी परतला. तर पवन रथनायकेने अवघ्या १० धावा केल्या. शेवटी कामिंदू मेंडिसने जोर लावला. पण तो ३१ धावांचे योगदान देऊन माघारी परतला. श्रीलंकेला .. धावांपर्यंत मजल मारता आली.

या पराभवासह श्रीलंकेचा संघ आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. हा सामना जिंकून श्रीलंकेकडे सेमी फायनलच्या दिशेने एक पाऊल टाकण्याची संधी होती. पण श्रीलंकेने २ पैकी २ दोन्ही सामने गमावले आहेत. पुढील सामना जिंकूनही श्रीलंकेचा संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करू शकणार नाही. तर दुसरीकडे न्यूझीलंडचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. आता श्रीलंकेला हरवून न्यूझीलंडने ३ गुणांची कमाई केली आहे.