IND vs NZ Tom Latham Statement on Team India: न्यूझीलंड क्रिकेट संघाला १६ ऑक्टोबरपासून भारताविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे, त्यातील पहिला सामना बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल. या मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ आधीच जाहीर झाला आहे. श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेत एकतर्फी पराभवाचा सामना केल्यानंतर टीम साऊदीने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. यानंतर टॉम लॅथमला संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. यानंतर टॉम लॅथमने भारतीय संघाच्या कसोटी मालिकेपूर्वी मोठे वक्तव्य केले आहे.

न्यूझीलंड संघाने भारताविरूद्ध मालिकेसाठी संघ आधीच जाहीर केला आहे. केन विल्यमसन ग्रोईनच्या दुखापतीमुळे पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार नाही, हा न्यूझीलंड संघासाठी निश्चितच मोठा धक्का आहे. मात्र, असे असतानाही भारत दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी न्यूझीलंड संघाचा कर्णधार टॉम लॅथमचे मोठे वक्तव्य समोर आले आहे.

IND vs NZ Anil Kumble Lashes Out At Rohit Sharma and Gautam Gambhir
IND vs NZ : ‘तुम्ही फलंदाजांना दोष देऊ नका…’, मालिका गमावल्यानंतर अनिल कुंबळे रोहित-गौतमवर संतापले
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते…
IND vs NZ Harbhajan Singh Statement
IND vs NZ : ‘भारतासाठी ‘ती’ गोष्ट शत्रू ठरतेय…’, मायदेशात पहिल्यांदाच कसोटीत व्हाइट वॉश झाल्यानंतर हरभजन सिंगचे मोठे वक्तव्य
IND vs NZ Tom Latham Statement After India clean sweep
IND vs NZ : ‘आम्ही भारतीय संघाच्या खेळण्याच्या पद्धतीबद्दल…’, ऐतिहासिक मालिका विजयानंतर टॉम लॅथमने सांगितले किवीच्या यशाचे गुपित
New Zealand cricket team
Ind vs New: न्यूझीलंडने भारतात येऊन ‘करून दाखवलं’, ७ अचंबित करणारे विक्रम केले नावावर, जाणून घ्या
IND vs NZ Five Reasons for India Defeat
IND vs NZ : भारतीय संघावर का ओढवली मायदेशात मालिका पराभवाची नामुष्की?
IND vs NZ India suffered their first-ever home series whitewash in a three-match Test series, losing the third Test at the Wankhede Stadium in Mumbai by 25 runs on Sunday
IND vs NZ : टीम इंडियाचा सलग तिसऱ्या सामन्यात लाजिरवाणा पराभव! न्यूझीलंडने व्हाइट वॉश करत भारतात घडवला इतिहास
New Zealand set India a target of 174 in IND vs NZ 3rd Test Match
IND vs NZ : भारताच्या फिरकीपटूंसमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी टेकले गुडघे, टीम इंडियाला विजयासाठी मिळाले १४७ धावांचे लक्ष्य

हेही वाचा – Hardik Pandya: “अखेर मला असा कोणीतरी भेटला…”, म्हणत ‘या’ भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीने शेअर केले हार्दिक पंड्याबरोबरचे फोटो

भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने केले मोठे वक्तव्य

शुक्रवारी न्यूझीलंड संघ भारतात रवाना होण्यापूर्वी लॅथम म्हणाला, ‘भारत दौरा नेहमीच रोमांचक आणि आव्हानात्मक असतो. आशा आहे की आम्ही तिथे काहीसे मुक्तपणे आणि धैर्याने खेळू आणि त्यांच्यावर वर्चस्व राखण्याचा प्रयत्न करू. असे केले तर विजय मिळवण्याची चांगली संधी आमच्याकडे असेल.

भारताने मायदेशात सलग १८ कसोटी मालिका जिंकल्या आहेत, तर न्यूझीलंड जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या चालू चक्रात सलग चार मालिका गमावल्यानंतर भारत दौऱ्यावर येत आहे. न्यूझीलंडने आतापर्यंत भारतात केवळ दोनच कसोटी सामने जिंकले आहेत. यातील शेवटचा विजय त्यांनी १९८८ मध्ये मिळवला होता.

हेही वाचा – Rohit Sharma: कॅप्टन असावा तर असा… रोहित शर्माने अपघातग्रस्त मुशीर खानसाठी केलं असं काही की चाहत्यांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव

लॅथम म्हणाला, ‘भारतात, गेल्या काही वर्षांत ज्या संघांनी त्यांना पराभूत केले. त्या प्रत्येक संघाने त्यांच्याविरुद्ध विशेषतः फलंदाजीत अतिशय आक्रमक क्रिकेट खेळल्याचे आपण पाहिले आहे. तिथे पोहोचल्यानंतर परिस्थिती पाहून आम्ही योजना आखून त्यानुसार खेळू, पण या कसोटी मालिकेत कसे खेळायचे आहे, हे सर्व खेळाडूंनी आपापले नियोजन केले आहे.

.१९८८ मध्ये भारतात न्यूझीलंडचा अखेरचा विजय

भारतातील न्यूझीलंड संघाचा कसोटी विक्रम पाहिला तर तो खूपच वाईट आहे, ज्यामध्ये त्यांना भारतात एकदाही कसोटी मालिका जिंकण्यात यश आलेले नाही, तर आतापर्यंत खेळलेल्या ३६ कसोटी सामन्यांपैकी केवळ २ सामने जिंकता आले आहेत. न्यूझीलंड संघाने १९८८ मध्ये भारतात शेवटचा कसोटी सामना जिंकला होता. अशा परिस्थितीत किवी संघाचा कर्णधार टॉम लॅथमसाठी हा दौरा अजिबात सोपा असणार नाही.