विश्वचषक जिंकल्यानंतर बेफाम खेळाडूचं नग्न सेलिब्रेशन…फोटो व्हायरल

सहकाऱ्यांसोबतही केलं खास फोटोसेशन

कर्ट बाकरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

आतापर्यंत विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकल्यानंतर विजयी संघातल्या खेळाडूंचं सेलिब्रेशन आपण पाहिलं असेल. क्रिकेटमध्ये, फुटबॉलमध्ये प्रत्येक खेळाडूची सेलिब्रेशनची आपली अनोखी स्टाईल असते. काही जण शर्ट काढून आपला आनंद व्यक्त करतात तर काही खेळाडूंची आनंद व्यक्त करण्याची एक ट्रेडमार्क स्टाईल बनलेली असते. मात्र न्यूझीलंडच्या रग्बी संघातील एका खेळाडूने विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकल्यानंतर चक्क नग्न होत सेलिब्रेशन केलं आहे. कर्ट बाकर असं या खेळाडूचं नाव असून त्याच्या या सेलिब्रेशनचे फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहेत.

अमेरिकेतील सॅनफ्रॅन्सिस्को शहरात रवीवारी रग्बी विश्वचषकाची अंतिम फेरी पार पडली. अंतिम सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडचा ३३-१२ असा पराभव केला. याचसोबत न्यूझीलंडने रग्बी विश्वचषक लागोपाठ जिंकण्याचा पराक्रम केला आहे. या विजयानंतर आपल्या सहकाऱ्यांसोबत ड्रेसिंग रुममध्ये सेलिब्रेशनदरम्यान बेफाम झालेल्या कर्टने नग्न होतं फोटोसेशन केलं. याचसोबत न्यूझीलंडच्या महिला संघानेही विश्वचषकाची अंतिम फेरी जिंकल्यामुळे न्यूझीलंडचा आनंद चांगलाच द्विगुणीत झाला आहे.

This just happened

A post shared by Kurt Baker (@krutbaker) on

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: New zealand player strips off to celebrate rugby sevens world cup win

ताज्या बातम्या