न्यूझीलंडने भारताविरुद्ध १८ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या तीन टी-२० आणि तितक्याच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. भारताविरुद्धच्या वनडे आणि टी-२० मालिकेत केन विल्यमसन न्यूझीलंड संघाचा कर्णधार असेल. ट्रेंट बोल्ट आणि सलामीवीर मार्टिन गुप्टिल यांना संघात स्थान मिळालेले नाही. त्याऐवजी निवडकर्त्यांनी युवा फलंदाज फिन ऍलनला दोन्ही मालिकेसाठी संघात स्थान दिले आहे.

उभय संघांमधला पहिला टी-२० सामना १८ नोव्हेंबर रोजी वेलिंग्टन येथे खेळवला जाईल. ऍलन प्रथमच भारताविरुद्ध खेळताना दिसणार आहे. २३ वर्षीय फलंदाजाने न्यूझीलंडकडून आतापर्यंत २३ टी-२० आणि ८ वनडे सामने खेळले आहेत. त्याने दोन्ही फॉरमॅटमध्ये ५ अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे. ऍलनचा संघात समावेश करण्यात आल्याने गुप्टिलला यापुढे टॉप ऑर्डरमध्ये स्थान मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Hardik Pandya Slapped With Fine Of 12 Lakh rupees By BCCI
मुंबई इंडियन्सचा विजय सेलिब्रेट करताना हार्दिक पंड्याला धक्का; ‘या’ साठी बीसीसीआयने ठोठावला १२ लाखांचा दंड
IPL 2024 : चेन्नईसाठी आनंदाची बातमी, पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी ‘या’ खेळाडूला बोर्डाकडून मिळाली सुट्टी
Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक

भारताविरुद्धच्या मालिकेसाठी ट्रेंट बोल्टचाही न्यूझीलंड संघात समावेश करण्यात आलेला नाही. टिम साउथी, मॅट हेन्री (केवळ एकदिवसीय), लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर आणि अॅडम मिल्ने हे वेगवान आक्रमणाचे नेतृत्व करतील. या मालिकेद्वारे मिल्ने २०१७ नंतरचा पहिला वनडे खेळू शकतो. घरच्या मैदानावर तो शेवटची तिरंगी मालिका खेळला होता. टॉम लॅथम वनडेमध्ये यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळणार आहे, तर डेव्हन कॉनवे टी-२० मध्ये हीच भूमिका बजावेल. जिमी नीशम लग्नाच्या तयारीमुळे तिसरा एकदिवसीय सामना खेळणार नाही. हेन्री निकोल्स त्याची जागा घेणार आहेत. दुखापतीमुळे काइल जेम्सनच्या नावाचा विचार करण्यात आला नाही.

न्यूझीलंड संघाचे प्रशिक्षक गॅरी स्टेड म्हणाले, ”बोल्ट आणि गप्टिलसारख्या अनुभवी खेळाडूंना सोडणे सोपे नव्हते. पण, संघाला पुढे पाहावे लागेल. ट्रेंटने या वर्षी ऑगस्टमध्ये न्यूझीलंड क्रिकेटच्या करारातून बाहेर पडताना, मध्यवर्ती किंवा देशांतर्गत करार असलेल्या खेळाडूंना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला होता आणि या मालिकेसाठी संघ निवडताना आम्ही ते लक्षात घेतले होते. गोलंदाज म्हणून बोल्टची क्षमता आपल्या सर्वांना माहीत आहे. पण, या टप्प्यावर- आम्ही मोठ्या स्पर्धांकडे वाटचाल करत आहोत. त्यामुळे आम्ही युवा खेळाडूंना अधिक संधी देऊ इच्छितो.”

ते पुढे म्हणाले, “पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये फिनचा उदय आणि आघाडीच्या फळीतील यशाचा अर्थ असा होतो की मार्टिन गप्टिलसारख्या हेवीवेट फलंदाजाला संघात स्थान मिळू शकले नाही.” पुढील वर्षी एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार आहे. आम्हाला एलेनला आणखी संधी द्यायची आहेत. विशेषत: भारतासारख्या संघाविरुद्ध.

पहिला टी-२० १८ नोव्हेंबरला खेळवला जाईल –

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिली टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना १८ नोव्हेंबरला वेलिंग्टनमध्ये, दुसरा सामना २० नोव्हेंबरला तरंगामध्ये आणि तिसरा टी-२० २२ नोव्हेंबरला नेपियरमध्ये खेळवला जाईल. पहिला एकदिवसीय सामना २५ नोव्हेंबर रोजी ऑकलंड येथे होणार आहे. दुसरा सामना २७ नोव्हेंबरला हॅमिल्टनमध्ये आणि तिसरा सामना ३० नोव्हेंबरला क्राइस्टचर्चमध्ये खेळवला जाईल. एकदिवसीय मालिकेत टीम साऊथीला त्याच्या २०० वनडे विकेट पूर्ण करण्याची संधी असेल. अशी कामगिरी करणारा तो न्यूझीलंडचा ५वा गोलंदाज ठरणार आहे.

हेही वाचा – कोहली, सूर्यकुमार ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या सर्वोत्तम संघात

भारताविरुद्ध न्यूझीलंडचा संघ (एकदिवसीय आणि टी-२० दोन्ही) –

केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे (टी-२० यष्टीरक्षक), लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री (वनडे), टॉम लॅथम (वनडे,यष्टिरक्षक), डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, ईश सोधी (टी-२०), टिम साउथी, ब्लेअर टिकनर (टी-२०).