scorecardresearch

न्यूझीलंड-श्रीलंका कसोटी मालिका: मिचेलच्या शतकामुळे न्यूझीलंडला,पहिल्या डावात आघाडी

New Zealand Sri Lanka Test Series डॅरेल मिचेलचे (१०२) शतक आणि मॅट हेन्रीच्या (७२) अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी श्रीलंकेविरुद्ध पहिल्या डावात आघाडी मिळवली.

Daryl Mitchell

New Zealand Sri Lanka Test Seriesख्राईस्टचर्च : डॅरेल मिचेलचे (१०२) शतक आणि मॅट हेन्रीच्या (७२) अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी श्रीलंकेविरुद्ध पहिल्या डावात आघाडी मिळवली. मिचेल व हेन्री यांच्याशिवाय नील वॅगनरने २७ धावांची खेळी केली. त्यामुळे न्यूझीलंडने पहिल्या डावात ३७३ धावसंख्या उभारताना १८ धावांची आघाडी मिळवली. श्रीलंकेने तिसऱ्या दिवसअखेर आपल्या दुसऱ्या डावात ३ बाद ८३ धावा केल्या.

श्रीलंकेकडे एकूण ६५ धावांची आघाडी आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा अँजेलो मॅथ्यूज (२०) व प्रभात जयसूर्या (२) खेळत होते.न्यूझीलंडने तिसऱ्या दिवसाला ५ बाद १६२ धावसंख्येच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. मिचेलला मायकल ब्रेसवेल (२५) व कर्णधार टिम साउदी (२५) यांनी चांगली साथ दिली.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-03-2023 at 00:15 IST