नेयमारच्या दोन गोलांच्या बळावर ब्राझीलने आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामन्यात तुर्कस्तानवर ४-० असा दणदणीत विजय मिळवला.  फर्नाडिनोच्या क्रॉसवर नेयमारने १९व्या मिनिटाला ब्राझीलचे खाते खोलले. पाच मिनिटांनंतर सुआट कायाच्या स्वयंगोलमुळे ब्राझीलची आघाडी २-० अशी वाढली. विलियनने तिसरा गोल झळकावल्यानंतर नेयमारने स्वत:चा दुसरा आणि संघासाठी चौथा गोल करत ब्राझीलला विजय मिळवून दिला.