scorecardresearch

अभिमानास्पद! महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या निखत झरीनने जिंकलं सुवर्णपदक

भारतासाठी अभिमानाची बातमी आहे. भारतीय बॉक्सिंगपटू निखत झरीनने महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धा जिंकत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे.

Nikhat Zareen Indian Boxer

भारतासाठी अभिमानाची बातमी आहे. भारतीय बॉक्सिंगपटू निखत झरीनने महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धा जिंकत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे. यासह जागतिक बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक मिळवणारी पाचवी भारतीय महिला आहे. तिने इस्तांबुलमध्ये झालेल्या सामन्यात थायलंडची जुतामास जितपाँगला ५-० ने पराभूत केलं.

निखत झरीनने ५२ किलो गटात महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेचा अंतिम सामना जिंकत सर्व भारतीयांची मान अभिमानाने उंचवली आहे. आतापर्यंत सहा वेळा विजेती एमसी मेरी कोम, सरिता देवी, जेनी आरएल आणि लेखा सी या महिला बॉिक्सगपटूंनी जागतिक विजेतेपदे पटकावली आहेत. यात आता निखत झरीनचा समावेश झाला आहे.

दरम्यान, उपांत्य सामन्यात निखतने आत्मविश्वासाने खेळ करीत ब्राझिलच्या कॅरोलिन डी अल्मेडाला ५-० असे सहज नामोहरम केले होते. कनिष्ठ विश्वविजेत्या निखतने संयमी खेळाचे प्रदर्शन करीत कॅरोलिनवर निर्विवाद वर्चस्व गाजवले होते. पण, मनीषाने टोक्यो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या इटलीच्या इरमा टेस्टाकडून ०-५ अशी हार पत्करली, तर परवीनने युरोपियन कांस्यपदक विजेत्या आर्यलडच्या एमी ब्रॉडहस्र्टकडून १-४ असा पराभव पत्करला होता.

हेही वाचा : पुरुषांच्या क्षेत्रात ‘खेळ मांडियेला’ : मेरी कोमचा पंच!

२०१९ मध्ये आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या मनीषाने दुसऱ्यांदा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत खेळताना ताकदीने फटके खेळत तांत्रिक गुणाधिक्याच्या बळावर विजयासाठी प्रयत्नांची शर्थ केली. परंतु इरमापुढे तिचा निभाव लागला नाही.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nikhat zareen win gold medal boxing world championship final in instanbul pbs

ताज्या बातम्या