India vs Afghanistan 3rd T20I, Nitish Kumar Reddy 3 Wickets: भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेचा थरार रंगला. या मालिकेतील तिसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर पार पडला. गेल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाने धावांचा पाठलाग करताना विजय मिळवला होता. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २२१ धावांचा डोंगर उभारला होता. २२२ धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा डाव अवघ्या अवघ्या ९४ धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाने हा सामना १२७ धावांनी आपल्या नावावर केला. यादरम्यान नितीश कुमार रेड्डीच्या गोलंदाजीचा कहर पाहायला मिळाला.

या सामन्यात अफगाणिस्तानचा संघ २२२ धावांचा डोंगर सर करण्यासाठी मैदानात उतरला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. त्यामध्ये एकापाठोपाठ एक फलंदाज बाद होत होते. दरम्यान १२ व्या षटकात नितीश कुमार रेड्डीने अफगाणिस्तानच्या फलंदाजीचं कंबरडं मोडलं आणि भारतीय संघाला जवळजवळ विजय मिळवून दिला.

एकाच ओव्हर मध्ये घेतल्या ३ विकेट्स

या सामन्यात नितीश कुमार रेड्डी फलंदाजीत हवी तशी कामगिरी करू शकला नाही. पण गोलंदाजीत त्याने मोलाचं योगदान दिलं. श्रेयस अय्यरने १२ वे षटक टाकण्याची जबाबदारी नितीश रेड्डीकडे सोपवली. या षटकात त्याने अफगाणिस्तानच्या ३ फलंदाजांना तंबूत पाठवलं. षटकातील पहिल्याच चेंडूवर त्याने मोहम्मद नबीला त्रिफळाचित केलं. त्यानंतर पुढच्या चेंडूवर १ धाव घेतल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर अजमतुल्लाह ओमरजई रवी बिश्नोईच्या हातून झेलबाद होऊन माघारी परतला. त्यानंतर षटकातील पाचव्या चेंडूवर मुजीब उर रहमानला बाद करत त्याने अफगाणिस्तानला आठवा धक्का दिला.

भारतीय संघाचा विजय

या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. पण हा निर्णय पूर्णपणे फसला. कारण अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या जोडीने अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. अभिषेकने ३० चेंडूत वेगवान शतक झळकावलं. तर संजू सॅमसनने देखील ५० धावांचे योगदान दिले. तसेच कर्णधार श्रेयस अय्यरने २९ धावांचे योगदान दिले. भारतीय संघाने २० षटकात २२१ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तानकडून एकही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. भारतीय संघाने हा सामना १२७ धावांनी आपल्या नावावर केला.