Nitish Reddy Family Video IND vs AUS: नितीश रेड्डीने २१व्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी शतक झळकावत आपलं पहिलं आंतरराष्ट्रीय शतक केलं आहे. नितीश रेड्डीने फक्त त्याचे शतकच पूर्ण केले नाही तर त्याने मेलबर्न कसोटीत भारताचं आव्हान कायम ठेवलं आहे. नितीश रेड्डी १०५ धावा करत नाबाद परतला आहे. तर वॉशिंग्टन सुंदरबरोबर त्याने शतकी भागीदारी रचत भारताची धावसंख्या ३५८ वर नेली आहे. नितीश रेड्डीला आंतरराष्ट्रीय कसोटी खेळताना पाहण्यासाठी त्याचं संपूर्ण कुटुंब ऑस्ट्रेलियामध्ये आहे. त्याच्या या शतकानंतर त्याचे आई,वडिल आणि बहिण भावुक होत आनंद साजरा करताना दिसले.
नितीश रेड्डीच्या शतकाच्या वेळेस त्याचे वडिल आणि काक स्टेडियममध्ये उपस्थित होते. नितीशच्या प्रत्येक धावेवर त्याचे वडिल प्रार्थना करताना दिसले. नितीशने चौकार लगावत आपले शतक पूर्ण केले आणि त्याच्या वडिलांनी एकच जल्लोष केला आणि त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले. यानंतर खराब प्रकाशामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. यानंतर त्याच्या वडिलांनी उर्वरित कुटुंबाची भेट घेतली आणि सर्वच भावुक झालेले पाहायला मिळाले.
नितीशचे वडिल कुटुंबासह उभे असताना म्हणाले, “खूप वेगळी भावना आहे. आजचा दिवस खास आहे, नितीशचं पहिलं आंतरराष्ट्रीय शतक. खूप खूप जास्त आनंदी आहे.” नितीशच्या बहिणीने भावुक होत त्याच्या शतकाबाबत बोलताना म्हणाली, “खूप आनंदी आहोत, आज सर्व आम्ही इथे त्याचा सामना पाहायला आलो होतो आणि त्याने त्याचवेळेस त्याने शतक झळकावलं आहे, हे शब्दात सांगण्यासारखं नाही. बाबा या शतकासाठी खूप प्रार्थना करत होते.”
Nitish Kumar Reddy's father said, "Virat Kohli is Nitish's idol. Virat told him that there's no substitute for hard work". (CricSubhayan). pic.twitter.com/kokGFznYiL
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— THREAD MSG (@ThreadMSG) December 28, 2024
विराट कोहली नितीश रेड्डीचा आदर्श आहे आणि त्याने नितीशच्या शतकावर उभं राहून त्याचं कौतुक केलं, यावर बोलताना त्याचे वडिल म्हणाले, विराट कोहलीने त्याला सांगितलं खूप कष्ट करायचे आहेत. यानंतर नितीशची आईदेखील भावुक झाली होती आणि तिनेही आनंद व्यक्त केला.