No Handshake In India vs Pakistan Match: जपानच्या आयची- नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेतील फायनलचा सामना भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यातही असं काही घडलं, जे २०२५ पासून आतापर्यंत झालेल्या भारत – पाकिस्तान सामन्यांमध्ये पाहायला मिळालं आहे. भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने पाकिस्तानचा कर्णधार साहिबजादा फरहानसोबत हात मिळवण्यास नकार दिला.

फक्त क्रिकेटच का?

आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत अनेक असे सामने झाले, ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यांमध्ये भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंसोबत हँडशेक केलं. पण क्रिकेटमध्ये नाणेफेक झाल्यानंतर भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने पाकिस्तानच्या कर्णधाराने हँडशेक करण्यास नकार दिला. २०२५ मध्ये झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानसोबत खेळण्यास तर होकार दिला होता. पण पाकिस्तानी खेळाडूंसोबत हँडशेक करणार नसल्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर जितक्या वेळेस भारत आणि पाकिस्तान संघ आमनेसामने आले आहेत, या सामन्यांमध्ये भारतीय खेळाडूंनी हँडशेक केलेलं नाही.

हँडशेक न केल्याने कारवाई होणार का?

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीचे नियम पूर्णपणे वेगळे आहेत. OCA किंवा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) च्या नियमांनुसार खेळाडूंनी एकमेकांशी हस्तांदोलन करणे बंधनकारक नाही. मात्र, खेळाडूवृत्तीचा भाग म्हणून हस्तांदोलन करणे ही एक सामान्य पद्धत मानली जाते. याआधी २०१६ मध्ये झालेल्या रियो ऑलिम्पिक स्पर्धेत इजिप्तचा ज्युडोपटू इस्लाम अल शेहाबीने इस्त्रायलचा खेळाडू ओर सॅसनने हस्तांदोलन करण्याशी नकार दिला होता. IOC ने त्याच्यावर कुठलीही आर्थिक कारवाई केली नव्हती. पण, निष्पक्ष खेळाच्या भावनेविरुद्ध आणि ऑलिम्पिकच्या नियमांच्या विरोधात वागल्याबद्दल त्याला कडक शब्दांत फटकारलं होतं. त्यानंतर इजिप्तच्या संघाने त्याला मायदेशी पाठवलं होतं.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेईंग ११:

पाकिस्तान (प्लेइंग XI): साहिबजादा फरहान (कर्णधार), माअज सदाकत, उस्मान खान (यष्टीरक्षक), सैम अय्युब, हसन नवाज, अब्दुल समद, अराफात मिन्हास, अहमद दानियाल, साद मसूद, अबरार अहमद, सुफियान मोकीम

भारत (प्लेइंग XI): वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), ईशान किशन, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह</p>

Live Updates