आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सप्टेंबर २०२२ साठी पुरूष आणि महिला गटातील प्लेअर ऑफ द मंथसाठी प्रत्येकी ३ खेळाडूंची निवड केली आहे. दोन्ही श्रेणीतील एकूण ६ खेळाडूंपैकी ३ भारतीय आहेत. यामध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, उपकर्णधार स्मृती मंधाना आणि भारतीय पुरुष क्रिकेटपटू अक्षर पटेल यांचा समावेश आहे. प्लेअर ऑफ द मंथसाठी नामांकित खेळाडूंच्या यादीत पाकिस्तान, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाचा प्रत्येकी एक क्रिकेटपटू आहे.

आयसीसी पुरुषांच्या टी२० फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानला सप्टेंबर २०२२ साठी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूसाठी निवडण्यात आले आहे. रिझवानने गेल्या महिन्यात १० सामने खेळले. यातील त्याने २०१४ मध्ये अर्धशतक झळकावले. या यादीत ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून ग्रीनचेही नाव आहे. अक्षरने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत अत्यंत किफायतशीर गोलंदाजी करताना ९ बळी मिळवले होते. ग्रीन याने देखील याच मालिकेत दोन आक्रमक अर्धशतके झळकावली होती. तर रिझवानने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तसेच आशिया चषकात सातत्यपूर्ण फलंदाजी केली होती.

Sanju Samson should be groomed as next T20 captain for India after Rohit says Harbhajan Singh
Team India : रोहितनंतर भारताचा टी-२० कर्णधार कोण होणार? हार्दिक-पंतकडे दुर्लक्ष करत हरभजनने सांगितले ‘हे’ नाव
Afghanistan Cricketer rashid khan
क्रिकेटने अफगाणिस्तानमधील जनता आनंदी – रशीद खान
Wakad Police Arrest 10 for IPL Betting Extortion through Betting
पिंपरी : आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेटिंग; दहा जण अटकेत
India Vs Pakistan bilateral series
IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यांच्यात मालिका होणार? क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आयोजनासाठी व्यक्त केली इच्छा

हरमनप्रीत कौरसाठी सप्टेंबर २०२२ हा केवळ एक फलंदाज म्हणून नव्हे तर भारतीय संघाची कर्णधार म्हणूनही संस्मरणीय महिना होता. तिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा ३-० असा पराभव केला. १९९९ नंतर भारताचा इंग्लंडमध्ये हा पहिलाच मालिका विजय होता. हरमनप्रीतने या मालिकेत १०३.२७ च्या स्ट्राईक रेटने २२१ धावा केल्या. ती या मालिकेत सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली. पहिल्या दोन सामन्यात तिने फिनिशरची भूमिका बजावली होती.

इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाच्या कर्णधाराला उपकर्णधार स्मृती मंधाना हिची चांगली साथ मिळाली. स्मृती मंधानाने पांढऱ्या चेंडूच्या दोन्ही मालिकेत सातत्यपूर्ण धावा केल्या. आयसीसी ची १००% क्रिकेट सुपरस्टार स्मृती मंधाना ही टी२० मालिकेत भारताच्या एकमेव विजयात सामनावीर ठरली. तिने ५३ चेंडूत नाबाद ७९ धावांची तुफानी खेळी केली. तिने या मालिकेत ५५.५० च्या सरासरीने आणि १३७.०३ च्या स्ट्राईक रेटने १११ धावा केल्या.