प्रमोद महाजन स्मृती राज्य सबज्युनियर बास्केटबॉल अजिंक्यपद स्पध्रेत शुक्रवारी मुंबई व सातारा यांनी आपआपल्या प्रतिस्पध्र्याना हरवत दणक्यात सलामी दिली. या स्पध्रेत साताऱ्याच्या संघांनी दोन्ही गटांत शानदार कामगिरी केली. मुलांच्या संघाने नांदेडचा ५४-१२ अशा फरकाने फडशा पाडल्यानंतर मुलींच्या गटात साताऱ्याच्या संघाने सोलापूरवर ३४-९ अशा फरकाने दिमाखदार विजय मिळवला. यशराजने १७, राज पाटीलने १२ गुण मिळवत साताऱ्याचा विजय सुकर केला. साताऱ्याच्या मुलींच्या विजयात बी श्रुतीने १८ गुण मिळवले.नाशिकनेही दुहेरी धमाका साजरा केला. मुलांच्या गटात रत्नागिरीचा ४४-१० अशा फरकाने खुर्दा केल्यानंतर मुलींच्या गटात अकोलाला १८-१ अशा फरकाने नेस्तनाबूत केले.