श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाची भारतीय संघात निवड करण्यात आलेली नाही. यानंतर, माध्यमांसमोर साहाने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासोबत झालेले संभाषण समोर आणले. साहाने एका पत्रकाराने सोशल मीडियावर दिलेल्या धमकीचा स्क्रीनशॉट शेअर केल्याने वाद आणखी वाढला. वृद्धिमान साहाने रविवारी केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर प्रशिक्षक राहुल द्रविड, राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी अप्रत्यक्षपणे आपल्याला निवृत्ती पत्करण्याचे संकेत दिले, असा आरोप साहाने केला.

“न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीनंतर दादाने (सौरव गांगुली) मला मेसेज केला आणि माझ्या खेळीसाठी अभिनंदन केले. त्याने माझा आत्मविश्वास वाढवला. गांगुलीने माझे कौतुक करतानाच तो ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष असेपर्यंत संघातील स्थानाची चिंता करू नये, असे आश्वासन दिले. यामुळे माझा आत्मविश्वास वाढला होता. पण त्यानंतर एका महिन्यातच चित्र पालटले,” असे साहाने मुलाखतीत सांगितले होते. त्याचवेळी राहुल द्रविडबद्दल बोलताना, “मला संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले होते की आता माझ्या नावाचा विचार केला जाणार नाही. राहुल द्रविडनेही मी निवृत्तीचा विचार करावा,” असा सल्ला दिला होता, असे साहाने म्हटले.

IPL 2024 Chennai Rajasthan Royals vs Gujarat Titans Match Updates in Marathi
IPL 2024: “असा विचार करू नका…” हर्षा भोगलेंना विजयानंतर शुबमन गिल नेमकं काय म्हणाला, पाहा व्हीडिओ
Supriya Sule
“सगळे पुरूष माझ्याविरोधात…”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य; म्हणाल्या, “मी स्वाभिमानी मुलगी, मोडेन पण वाकणार नाही!”
sharad pawar latest news
राजकारणात महिलांना पतीच्या तालावर नाचावं लागतं? प्रश्न विचारताच शरद पवार म्हणाले, “फक्त पुरुषांतच कर्तृत्व…!”
Vijaypat Singhania and his son Gautam Singhania
गौतम सिंघानिया आणि तुमच्यातला वाद मिटला?, विजयपत सिंघानिया म्हणाले, “इच्छा नसतानाही..”

“फक्त चमचेगिरी…”; पत्रकाराने धमकावल्यानंतर वृद्धीमान साहाला वीरेंद्र सेहवागने दिला पाठिंबा

राहुल द्रविडने दिले उत्तर

या संपूर्ण प्रकरणावर वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेनंतर राहुल द्रविडने पत्रकार परिषदेत उत्तर दिले. साहासोबतचे संभाषण समोर आल्यानंतर तुम्ही दु:खी आहात का? या प्रश्नाला उत्तर देताना द्रविडने याबाबत भाष्य केले. “मी अजिबात दु:खी नाही. साहाने भारतीय क्रिकेटसाठी जे काही केले त्याबद्दल मला खूप आदर आहे. मला त्याच्याबद्दल आदर होता म्हणून मी त्याच्याशी बोललो होतो. प्रामाणिकपणा आणि स्पष्ट भूमिका हा त्याचा हक्क आहे. त्याने माध्यमांकडून हे ऐकावे अशी माझी इच्छा नव्हती. मी नेहमीच खेळाडूंशी संवाद साधतो. मी जे काही बोलतो ते त्याला आवडेल आणि तो सहमत असेल असे नेहमीच होत नाही,” असे राहुल द्रविडने म्हटले.

सौरव गांगुलीच्या भावानेही दिली प्रतिक्रिया

“हे माझे वैयक्तिक मत आहे, पण त्याला (साहा) जे सांगितले गेले ते वैयक्तिक होते. त्याने हे सार्वजनिक करायला नको हो. तसेच तो रणजी ट्रॉफीही खेळू शकतो. त्याने बाहेर राहण्यामागे वैयक्तिक कारणे सांगितली आणि आपण त्याचा आदर केला पाहिजे. जेव्हा जेव्हा त्याला संघात सामील व्हायचे असते तेव्हा त्याच्यासाठी दरवाजे नेहमीच खुले असतील,” असे सौरव गांगुलीचा भाऊ स्नेहशिष गांगुली यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना म्हटले.

बीसीसीआय करणार चौकशी

भारतीय यष्टीरक्षक फलंदाजाने रविवारी एका पत्रकाराशी केलेल्या संभाषणाचे काही स्क्रीनशॉट शेअर केले होते. माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह अनेक माजी क्रिकेटपटूंनीही या प्रकरणी वृद्धीमान साहाचे समर्थन केले. त्याचबरोबर आता बीसीसीआयनेही याप्रकरणी कारवाईची तयारी केली आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट बोर्डाने कारवाई करण्यापूर्वी साहाला पत्रकाराचे नाव विचारले आहे, असे म्हटले आहे.