टेनिस कोर्टावर एरव्ही हुकमत गाजवणारा सर्बियन खेळाडू नोव्हाक जोकोव्हिचने सोमवारी ऑस्ट्रेलियन न्यायालयात विजयाची नोंद केली. वैद्यकीय सवलत हा आधार घेऊन लसीकरणाविना मागील बुधवारी मेलबर्न येथे दाखल झालेल्या जोकोव्हिचचा व्हिसा ऑस्ट्रेलियन सरकारने रद्द केला होता. मात्र, सोमवारी झालेल्या न्यायालयीन सुनावणीचा निकाल जोकोव्हिचच्या बाजूने लागला; परंतु या सुनावणीदरम्यान एक विचित्र प्रकार घडलाय. न्यायालयामध्ये सुनावणी सुरु असतानाच अचानक पॉर्न व्हिडीओ सुरु झाला.

लाइव्ह प्रसारण…
अनेक प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार एकीकडे जोकोव्हिचच्या प्रकरणाची व्हर्च्यूअल सुनावणी सुरु होती. एका स्क्रीनवर सुनावणी सुरु असतानाच दुसरीकडे पॉर्न व्हिडीओ सुरु झाला. मेलबर्नमधील न्यायालयामध्ये सुरु असणाऱ्या लाइव्ह स्ट्रीमिंगला हायजॅक करुन हे स्ट्रीमिंग करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. जोकोव्हिचच्या प्रकरणाची लाइव्ह सुनावणी त्याला मायक्रोसॉफ्ट टीमच्या लिंकवरुन उपलब्ध करुन देण्यात आलेली. सुनावणीदरम्यान मायक्रोफोन आणि व्हिडीओ सुरु ठेवण्यास न्यायालयाने जोकोव्हिचला परवानगी दिली होती.

nagpur court marathi news, nagpur petitioner donate 25 thousand
दे दान सुटे गिऱ्हाण! कोर्टाने याचिकाकर्त्यांना सुनावली अनोखी शिक्षा; नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
nagpur, rape victim girl missing, police started search operation, rape victim girl in nagpur, crime in nagpur, crime news, nagpur news, marathi news,
न्यायालयात गोंधळ घालणारी युवती अचानक बेपत्ता
Supreme Court Gyanvapi mosque
ज्ञानवापीच्या तळघरातील पूजेवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; मुस्लीम पक्षकारांची याचिका फेटाळली
Rashmi Barve
रश्मी बर्वे प्रकरणावर बुधवारी सुनावणी, जातवैधता प्रमाणपत्रामुळे निवडणूक अर्ज रद्द

दुसरी लिंक तयार केली…
मेट्रो डॉट को डॉट यूके, आरटी न्यूज आणि फॉक्स स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार लाइव्ह प्रसारणादरम्यान अनेकदा अडचणी आल्या. मोठा वाद टाळण्यासाठी प्रकरणाची सुनावणी नवीन लिंकवरुन प्रसारित करण्यात आली. मात्र नवीन लिंक दिल्यानंतरही अनेकांनी जुन्या लिंकवर क्लिक करुन सुनावणीमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या लिंकवर पॉर्न सुरु असल्याचं दिसलं.

नक्की घडलं काय?
ओरिजनल म्हणजेच आधी बनवण्यात आलेली लिंक हॅक करण्यात आलेली. त्यामुळेच काहींनी ही लिंक ओपन केली तेव्हा संगीत ऐकू येऊ लागलं. अनेक पत्रकारांनाही सुनावणी नवीन लिंकवर शिफ्ट करण्यात आल्याची कल्पना नसल्याने ते जुन्या लिंकवरुनच प्रसारण पाहत होते. त्यावेळी अचानक पॉर्न व्हिडीओ लागला. पत्रकारांनी ट्विट करुन यासंदर्भातील माहिती दिल्यानंतर न्यायालयाने दुसरी लिंक रद्द करुन प्रसारण पूर्णपणे बंद करण्यास सांगितलं.

…तरी ऑस्ट्रेलियन सरकारने दिला इशारा
दरम्यान, निकाल जोकोव्हिचच्या बाजूने लागला असला तरी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत खेळण्याचा त्याचा मार्ग मोकळा झालेला नसून ऑस्ट्रेलियन सरकारने दुसऱ्यांदा त्याचा व्हिसा रद्द करण्याचा इशारा दिला आहे.

निकाल देताना न्यायालयाने काय म्हटलं?
जोकोव्हिचला ऑस्ट्रेलियातून परत पाठवणीच्या खटल्याप्रकरणी सोमवारी सुनावणी झाली. न्यायाधीश अँथनी केली यांनी ऑस्ट्रेलियन सरकारचा जोकोव्हिचचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय मागे घेतानाच त्याला मेलबर्न येथील अवैध स्थलांतरितांच्या हॉटेलमधून अर्ध्या तासात सोडण्याचे आदेश दिले. तसेच व्हिसा रद्द करण्यापूर्वी त्याला वकिलांशी बोलण्यासाठी पुरेसा वेळ न दिल्याची टिप्पणीही न्यायाधीशांनी केली. ऑस्ट्रेलियातील दोन वैद्यकीय मंडळ आणि ‘टेनिस ऑस्ट्रेलिया’ संघटनेने जोकोव्हिचला लसीकरणात वैद्यकीय सवलत दिली होती. याचे पुरावे त्याने मेलबर्न विमानतळावरील अधिकाऱ्यांना दिले. त्याने आणखी काय करणे अपेक्षित होते? असा प्रश्नही न्यायाधीशांनी उपस्थित केला.

…तर खटला जिंकला तरी परत जावं लागेल
आता निकाल जोकोव्हिचच्या बाजूने लागला असला, तरी परकी नागरिकविषयक खात्याच्या मंत्र्यांना (इमिग्रेशन मिनिस्टर) त्याचा व्हिसा पुन्हा रद्द करण्याचा अधिकार आहे. ते याबाबत विचार करतील, असे सरकारी वकील ख्रिस्तोफर ट्रान यांनी न्यायाधीश केली यांना सांगितले. परकी नागरिकविषयक खात्याच्या मंत्र्यांनी त्यांचा अधिकार वापरल्यास जोकोव्हिचचा व्हिसा पुन्हा रद्द होईल आणि त्याला मायदेशी पाठवले जाऊ शकेल.