रॉजर फेडरर नंतर जोकोविचच्या निवृतीची चर्चा सुरु झाली आहे. तो मूळचा सर्बियाचा असून त्याने आतापर्यंत २१ ग्रँडस्लॅम जिंकले आहे. “अजून बरेच टेनिस शिल्लक आहे”, असे म्हणत नोवाक जोकोविच याने आपण इतक्यात टेनिसविश्वातून निवृत्त होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. इस्रायलची राजधानी तेल अवीव येथे खुल्या टेनिस स्पर्धा खेळण्याकरिता आलेला असताना त्याने पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले.

पत्रकारांशी संवाद साधताना जोकोविच पुढे असं म्हणतो की,” मी जरी या वर्षी झालेल्या ऑस्ट्रेलियन आणि यूएस ओपन स्पर्धेत सहभागी झालो नसलो, तरी माझ्यात अजून बरेच टेनिस शिल्लक असून माझ्यात टेनिस खेळायची बरीच भूक अजूनही बाकी आहे. मी टेनिस खेळताना बरेच काही साध्य केले असले, तरी मला अजून टेनिस खेळायचे आहे. त्याने एटीपी टूरशी संवाद साधताना वरील वक्तव्य केले आहे.

तसेच जोकोविचने रॉजर फेडररच्या निवृत्तीवरसुद्धा भाष्य केले असून, ‘‘रॉजरने आतापर्यंत टेनिस खेळाला बरेच काही दिले असून तो जगातील सर्वांत यशस्वी आणि आदरणीय खेळाडूंपैकी एक आहे. रॉजरची निवृत्ती ही संपूर्ण टेनिस विश्वासाठी दुःखदायक घटना असल्याचेही जोकोविच म्हणाला. जोकोविचने कोविड प्रतिबंधक लस घेतली नसल्याने तो २०२२ ऑस्ट्रेलियन ओपन आणि यूएस ओपन टेनिस स्पर्धेत सहभागी होऊ शकला नव्हता.